बीडच्या बसस्थानकात 300 मजूर दाखल : आरोग्य विभागाच्या 9 टीमकडून तपासणी
बीड दि.25 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातील 300 मजूर ( मदूराई ) तामिळनाडू राज्यात अडकले होते.त्यांना घेऊन आलेल्या बसेस बीड येथील बसस्थानकात आज दुपारी दाखल झाल्या. यामधून तब्बल तीनशे मजूर बीडमध्ये दाखल झाले आहेत. आरोग्य विभागाच्या 9 शहरी टीमकडून 36 कर्मचारी त्यांची तपासणी करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रिकामे असलेल्या बस स्थानकात आज दुपारी मात्र मजुरांची गर्दी झाली होती. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तपासणीसाठी मजुरांचा रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्व मजुरांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना जिल्ह्यातील आपापल्या गावी रवाना करण्यात येणार असून त्याठिकाणी नेल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान एकाच वेळी जिल्ह्यात पर राज्यातून 300 मजूर दाखल झाल्याने प्रशासनाला त्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कारण प्रत्येक गावाच्या सीमांवर दक्षता समित्या लक्ष ठेवून आहेत.
Add new comment