पंकजाताईं म्हणाल्या , गोपीनाथ गडावर गर्दी नको ; घरातच दोन दिवे / समई लावा !
बीड दि.29 ( सिटीझन ) लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची 3 जून रोजी पुण्यतिथी आहे. मात्र गोपीनाथ गडावर कोणीही दर्शनासाठी किंवा मला भेटण्यासाठी गर्दी करू नये. घरातच साहेबांच्या फोटोसमोर दोन दिवे , समई लावा असे आवाहन माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी फेसबुकवरून संघर्ष दिन या हॅशटॅगखाली केले आहे.
पंकजाताई म्हणाल्या, गडाचा कार्यक्रम साधा व मोजक्या लोकांत असेल, तो Live दाखवता येईल. तुम्ही सर्वांनी कुटुंबा समवेत मुंडे साहेबांच्या फोटो समोर उजव्या बाजूला घरातील महिला आणि डाव्या बाजूला पुरुष उभे राहून दोन दिवे/ समई लावायचे आहेत...
आजी, सुन, नात उजवीकडे, तर आजोबा, मुलगा, नातू डावीकडे असं उभं राहून दिवा लावायचा आहे.. साहेबांचा आवडता पदार्थ बनवयाचा, तो काय मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही.. हे दोन दिवे लावण्यास मी सांगितले ते स्त्री आणि पुरुष समानतेचा संदेश देणारे आणि समानता जगणारे म्हणून लावायचे..
कोणतही एक समाज कार्य करायचं, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत, अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधांचे वाटप इत्यादी..
सर्व कुटुंबीयांनी आणि हे सर्व करतानाचे फोटो माइया फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर पाठवायचे आहेत...
दुपारी 12 ते सायं. 6 मध्ये आपण हे कार्य करून कृपया शेअर करावे.. आणि स्वतःला जपा, गर्दी करु नका, घरात राहा. तुमच्या जीवाची काळजी साहेबांच्या एवढीच मला आहे....
कराल मग एवढं..?
गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी!!!
असे आवाहन पंकजाताई यांनी फेसबुक पोस्ट वरून केले आहे.
Add new comment