लाइव न्यूज़
धारूर शहर देखील पूर्ण बंद ; एक रुग्ण अनेकांच्या संपर्कात !
बीड दि.29 ( सिटीझन ) धारूर शहरात आढळलेला एक पॉझिटिव्ह रुग्ण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेकांच्या संपर्कात आल्याने आजपासून धारूर शहर पूर्ण बंद करून कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.
बीड जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, गुरुवारी आलेल्या रिपोर्टमध्ये धारूर शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे असा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाने दिलेला आहे. सदरील रुग्णाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क धारूर शहरात मोठ्या प्रमाणात आल्याचे दिसून येते. त्या अनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील अनिश्चित काळासाठी धारूर शहर पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.त्याठिकाणी पूर्णवेळ संचारबंदी लागू असेल असे रेखावार यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
Add new comment