बीड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : बीड शहर आज गुरुवारपासून पुढील 8 दिवस 100 टक्के लॉकडाऊन
बीड दि.28 ( सिटीझन ) कारेगाव ता. पाटोदा येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाने बीड शहरात आणि अनेक ठिकाणी भेटी दिल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवार दि. 28 मे पासून पुढील 8 दिवस म्हणजेच 4 जून 2020 पर्यंत पूर्ण शहर आणि 12 गावांमध्ये शंभर टक्के लॉक डाऊन ( पूर्णवेळ संचारबंदी ) लागू करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिले आहेत.
रेखावार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, शहरातील च ग्रामीण भागातील इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीड शहरात व बीड तालूक्यातील खंडाळा,चर्हाटा, पालवण , ईट, पाटोदा तालूक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही, वडवणी तालक्यातील देवडी, गेवराई तालूक्यातील खांडवी, मादळमोही , धारवंटा, केज तालूक्यातील खरगाटा व धारुर तालूक्यातील पारगांव या गांवामे 8 दिवसांसाठी (4 जुन 2020 रोजी रात्री 12 वा. पर्यंत ) संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात येत आहे व खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
■ वैद्यकीय सेवा , वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा 24 तास सुरु राहतील
■ बीड शहरात व वरील गावांमध्ये विशेष परवानगी शिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही. व शहरा बाहेरही जाता येणार नाही.
■ अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये वगळता (महसूल, ग्रामविकास व आरोग्य बीड शहरातील सर्व आस्थापना (शासकीय, खाजगी व बैका इ.) बंद राहतील, परंतु बीड शहरातील शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुखांना व बैंक यांना अतिशय आवश्यकता भासल्यास उपजिल्हाधिकारी रोहयो, बीड यांचेशी संपर्क साधून अत्यावश्यक बाब म्हणून कार्यालय उघडण्याची व अतिशय मर्यादीत कर्मचाऱ्यांनाच बोलविण्याची परवानगी घ्यावी.
■ बीड शहरातील व वरील गावांतील नागरिकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही, पंरतु मेडीकल Emergencey मधील पाससाठी बीज शहरातील नागरिकांनी
ऑनलाईन अर्ज www. covid19.mhpolice. in या वेबसाईटवर भरुन पास प्राप्त करुन घ्याया.
■ बीड शहरातील व वरील गावांमधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप तात्काळ डाऊनलोड करुन वापरणे
बंधनकारक राहील,
■ वरील बीड शहर व गावे वगळता अन्य गावांसाठी पूर्वी प्रमाणेच आदेश लागू राहणार आहेत.
असे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी काढले आहेत.
Comments
Sandeep kudke send your
Sandeep kudke send your whatsaap number
Add new comment