बीड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : बीड शहर आज गुरुवारपासून पुढील 8 दिवस 100 टक्के लॉकडाऊन

 

बीड दि.28 ( सिटीझन ) कारेगाव ता. पाटोदा येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाने बीड शहरात आणि अनेक ठिकाणी भेटी दिल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवार दि. 28 मे पासून पुढील 8 दिवस म्हणजेच 4 जून 2020 पर्यंत  पूर्ण शहर आणि 12 गावांमध्ये शंभर टक्के लॉक डाऊन ( पूर्णवेळ संचारबंदी ) लागू करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिले आहेत. 
रेखावार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, शहरातील च ग्रामीण भागातील इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीड  शहरात व  बीड तालूक्यातील खंडाळा,चर्हाटा, पालवण , ईट,  पाटोदा तालूक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही, वडवणी तालक्यातील देवडी, गेवराई तालूक्यातील खांडवी, मादळमोही , धारवंटा, केज तालूक्यातील खरगाटा व धारुर तालूक्यातील पारगांव या गांवामे 8 दिवसांसाठी (4 जुन 2020 रोजी रात्री 12 वा. पर्यंत ) संपूर्ण संचारबंदी घोषित  करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात येत आहे व खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

■ वैद्यकीय सेवा , वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा 24 तास सुरु राहतील

■  बीड शहरात व  वरील गावांमध्ये विशेष परवानगी शिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही. व शहरा बाहेरही जाता येणार नाही.
■ अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये वगळता (महसूल, ग्रामविकास व आरोग्य बीड शहरातील सर्व आस्थापना (शासकीय, खाजगी व बैका इ.) बंद राहतील, परंतु बीड शहरातील शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुखांना व बैंक यांना अतिशय आवश्यकता भासल्यास उपजिल्हाधिकारी रोहयो, बीड यांचेशी संपर्क साधून अत्यावश्यक बाब म्हणून कार्यालय उघडण्याची व अतिशय मर्यादीत कर्मचाऱ्यांनाच बोलविण्याची परवानगी घ्यावी.

■ बीड शहरातील व वरील गावांतील नागरिकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही, पंरतु मेडीकल Emergencey मधील पाससाठी बीज शहरातील नागरिकांनी
ऑनलाईन अर्ज www. covid19.mhpolice. in या वेबसाईटवर भरुन पास प्राप्त करुन घ्याया.

■ बीड शहरातील व वरील गावांमधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप तात्काळ डाऊनलोड करुन वापरणे
बंधनकारक राहील, 

■ वरील बीड शहर व गावे वगळता अन्य गावांसाठी पूर्वी प्रमाणेच आदेश लागू राहणार आहेत. 

असे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी काढले आहेत. 

 

Comments

Sandeep  kudke  send your whatsaap number 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.