बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णावर पहिले डायलिसीस
बीड दि.29 ( सिटीझन ) येथील जिल्हा रुग्णालयात एका 32 वर्षीय कोरोना बाधित तरुणावर आज डायलिसिस करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णावर झालेले हे पहिले डायलिसिस असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान कोरोना बाधित रुग्णावर इतर कोणतीही शस्त्रक्रिया करणे अवघड असते मात्र डॉ.अशोक थोरात आणि त्यांच्या टीमने हे आव्हान स्वीकारले आणि डायलिसिस केले.
बीड जिल्हा रुग्णालयात धारूर येथील एका कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. सदरील तरुण एका खाजगी रुग्णालयात डायलिसिससाठी दाखल झाला होता. मात्र कोविड टेस्टमध्ये तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्या रुग्णावर डायलिसिस करण्याची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे केली होती. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सदरील बाधित तरुणावर डायलिसिस करण्याचा निर्णय घेतला आणि आज जिल्हा रुग्णालयातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णावर डायलिसिस करण्यात आले. यावेळी डॉ.किशोर दुनघव , डॉ. मनोज मुंडे, सिस्टर स्वाती गव्हाणे , कर्मचारी बलभीम माने व सर्व आरोग्य टीमने परिश्रम घेतले.
Add new comment