Add new comment

बीड शहर आज गुरुवार पासून पुढील 8 दिवस 100 टक्के लॉकडाऊन

 

बीड दि.28 ( सिटीझन ) एका पॉझिटिव्ह रुग्णाने बीड शहरात आणि अनेक ठिकाणी भेटी दिल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवार दि. 28 मे रोजी पासून आठ दिवस पूर्ण शहरात शंभर टक्के लॉक डाऊन करण्यात येणार असल्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात विविध भागांमध्ये रात्री उशिरा पोलीस वाहनाच्या माध्यमातून उद्या गुरुवार दिनांक 28 मे पासून पुढील आठ  दिवस पूर्णपणे कर्फ्यु लावण्यात येत असल्याची माहिती देण्यात येत आहे. या कालावधीत हॉस्पिटल, मेडिकल या व्यतिरिक्त ईतर कोणतेही दुकाने उघडी राहणार नाहीत असे देखील सांगितले जात आहे. या संदर्भात पोलिसांकडून उद्घोषणा ( अनाऊन्समेंट ) करण्यात येत आहे. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.