भाजपचे 'ते' नगरसेवक झाले पक्षापेक्षा मोठे! नेतृत्वाचा सल्ला न घेता केला अविश्वास ठराव दाखल
पक्षासाठी योगदान देणाऱ्या नगराध्यक्षांच्या पाटीत खुपसला खंजीर.
राज गायकवाड / माजलगाव
माजलगावच्या विविध पक्षाच्या एकोणीस नगरसेवकांनी नगराध्यक्ष चाऊस यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी अविश्वास ठराव दाखल केला. यात भाजपाचे पाच नगरसेवक असून या अविश्वास ठरावा साठी यांनी नेतृत्वाची परवानगी न घेतल्याची माहिती समोर येत आहे. ज्या नगराध्यक्ष चाऊस यांनी पक्षाला अडचणीच्या काळात उभारण्याचे योगदान दिले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्षाचे राजकीय विरोधक असणाऱ्या प्रकाश सोळंकेशी हातमिळवणी केल्याने भाजपचे नगरसेवक पक्षापेक्षा मोठे झाले असल्याची चर्चा होताना दिसत आहे.
माजलगाव नगर परिषदेमध्ये भाजपचे पाच नगरसेवक आहेत. मोहन जगताप,सहाल चाऊस यांच्या पूर्वीच्या जन् विकास आघाडीशी याठिकाणी भाजपशी युती असून चाऊस हे नगराध्यक्ष आहेत.चाऊस भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या संधीचा फायदा घेत येथील भाजपाच्या पाच नगरसेवकांनी पक्ष्याच्या कुठल्याही नेतृत्वाशी चर्चा न करता राजकीय विरोधक असणाऱ्या प्रकाश सोळंके यांच्या राजकिय खेळीला बळी पडत नगराध्यक्ष चाऊस यांच्या विरोधात आज दुपारी अविश्वास ठराव दाखल केला आहे. हा अविश्वास ठराव म्हणजे पक्षाचे हितचिंतक चाऊस यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रतिक्रिया भाजपामधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. ही उठाठेव करताना या पाचही भाजप नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाला सी विचारविनिमय न करता मनमानी पद्धतीने निर्णय घेऊन पक्ष विरोधकांच्या हातात हात दिला असल्याची ची माहिती भाजपच्या गोटातून समोर येत आहे. ही वेळ कोरोना महामारीच्या विरोधात लढण्याची आहे.तर नगराध्यक्ष चाऊस गेल्या दोन अडीच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.अशा कठीण प्रसंगी पक्ष मित्र असणाऱ्या चाऊस यांच्या विरोधात अविश्वास दाखल करणे अत्यंत चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी यानिमित्त व्यक्त केल्या आहेत. खासदार ताई जिल्ह्यात आल्या असताना त्यांची परवानगी न घेता पक्षाच्याच नगराध्यक्षा विरोध पक्षाच्याच नगरसेवकांकडून हा अविश्वास ठराव दाखल होणे म्हणजे 'ते' नगरसेवक भाजपा पेक्षा मोठे झाले असल्याची चर्चा या निमित्ताने भाजपात व्यक्त होऊ लागली आहे.
Add new comment