बीड शहर

बीड जिल्ह्यात आज 17 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 17 पॉझिटिव्ह 

बीड दि.8 (सिटीझन )कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज बुधवारी 262 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीडमधील सर्वाधिक 96 स्वॅबसह अन्य रुग्णालयातील स्वॅबचा  समावेश होता. एकूण 263 पैकी 17 पॉझिटिव्ह आले आहेत. 238 रिपोर्ट निगेटिव्ह तर 7अनिर्णित आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णाचा आकडा वाढू लागला आहे. 

बीड जिल्ह्याचे टेन्शन वाढले ; आज 13 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्याचे टेन्शन वाढले, आज13 पॉझिटिव्ह 

बीड दि.7 (सिटीझन )कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज मंगळवारी 288 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीडमधील सर्वाधिक 106 स्वॅबसह  , परळी, माजलगाव, आष्टी, गेवराई , केज आणि अंबाजोगाई येथील स्वॅबचा  समावेश होता. एकूण 288  पैकी 13 पॉझिटिव्ह आले आहेत.  273 रिपोर्ट निगेटिव्ह तर 2  अनिर्णित आहेत. आतापर्यंत एका दिवसाचा पॉझिटिव्हचा आकडा 9 पर्यंत होता मात्र आज हा आकडा 13 पर्यंत गेला आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत आहेत.

बीड जिल्ह्यात आज 3 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 3 पॉझिटिव्ह 

बीड दि.6 (सिटीझन )कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज सोमवारी 197 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीड , परळी आणि अंबाजोगाई येथील स्वॅबचा  समावेश होता. एकूण 197 पैकी 3 पॉझिटिव्ह तर 186 .रिपोर्ट निगेटिव्ह तर  8 अनिर्णित आहेत. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेलले कोरोना मीटर आजही सुरूच आहे. मात्र बीड शहरात एकही रुग्ण आज आढळला नाही.

बीड जिल्ह्यात आज 6 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 6 पॉझिटिव्ह 

बीड दि.5 (सिटीझन )कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज रविवारी 248 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीड , परळी आणि अंबाजोगाई येथील स्वॅबचा सर्वाधिक समावेश होता. एकूण 248 पैकी 6 पॉझिटिव्ह तर 239.रिपोर्ट निगेटिव्ह तर 3 अनिर्णित आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलले कोरोना मीटर आजही सुरूच आहे

गेवराईतील ' या ' भागात पूर्णवेळ संचारबंदी

गेवराईतील या भागात पुर्णवेळ संचारबंदी

गेवराई दि.5 (सिटीझन)

गेवराई येथील इस्लामपुरा भागातील एक रूग्ण अहमदनगर येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. त्याच्यावर बीड जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या अनुशंगाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गेवराई शहरातील काही भागात पुर्णवेळ संचारबंदी लागु केल्याचे आदेश आज दुपारी काढले आहेत.

परळी शहर आजपासून पूर्ण लॉकडाऊन

परळी आजपासून 8 दिवस लॉकडाऊन 

बीड दि.5 (सिटीझन ) परळी शहरातील शहरातील स्टेट बैंक ऑफ इंडिया येथील पाच अधिकारी/ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परळी शहर आजपासून 8 दिवस म्हणजेच दि.12 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पुर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश मध्यरात्री काढण्यात आले. 

बीड जिल्ह्यात आज 9 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 9 पॉझिटिव्ह 

बीड दि. 4 ( सिटीझन ) जिल्ह्यातून आज 251 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. या सर्व स्वॅबचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून 251 पैकी 9 पॉझिटिव्ह , 242 निगेटिव्ह आले आहेत. आज जिल्ह्यातून सर्वाधिक 251 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यामुळे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष याकडे लागले होते. 

खा. प्रितमताई म्हणाल्या , बाबांचे आशीर्वाद आणि भाजपचे संस्कार ...

खा. प्रितमताई म्हणाल्या, बाबांचे आशीर्वाद ...

 

बीड दि.3 ( सिटीझन ) भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी ट्विट करून जबाबदारी नेकीने पार पाडेल असा विश्वास दिला. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की ,

बीड जिल्ह्यातील शाळा , महाविद्यालये 31 जुलै पर्यंत बंद - दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

बीड जिल्ह्यातील सर्व शाळा , महाविद्यालये 31  जुलैपर्यंत बंदच 

बीड दि.3 ( सिटीझन ) जिल्ह्यात 9 , 10 वी आणि 12 वीचे वर्ग दि.6 जुलै 2020 पासून सुरू करण्याचे आदेश बीड जिल्हा शिक्षण विभागाने काढले होते. मात्र  महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन कालावधी दि.31 जुलै पर्यंत वाढविल्यामुळे बीड जिल्हातील सर्व शाळा,  कनिष्ठ महाविद्यालये दि.31 जुलै 2020 पर्यंत बंद राहतील असे आदेश आज दि.3 जुलै रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी अजय बहिर व माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश खटावकर यांनी संयुक्तरित्या काढले आहेत.

बीड : आज 4 पॉझिटिव्ह ; 155 निगेटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 4 पॉझिटिव्ह 155 निगेटिव्ह

बीड दि.2 ( सिटीझन ) जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज गुरुवारी 159 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रशासनाला अहवाल प्राप्त झाले असून 159 पैकी 4 रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 154 निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णामध्ये शहरातील एका डॉक्टरचाही समावेश असल्याचे समजते.
बीड शहरातून जिल्हा सामान्य रुग्णालय 47 आणि कोविड केअर सेंटर 29 असे एकूण 76 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष अहवालाकडे लागले होते.

बीड शहर 9 जुलैपर्यंत लॉकडाऊन

बीड शहर 9 जुलै पर्यंत लॉकडाऊन 

बीड : आज 3 रिपोर्ट पॉझिटिव्ह

बीड शहरात 3 पॉझिटिव्ह 

 

बीड दि.1 ( सिटीझन ) कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी आज बुधवारी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून एकूण 54 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. यासर्व व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून 54 पैकी 3 रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 48 निगेटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

 

*कोविड १९-बीड अपडेट - 01/जुलै/२०२०*

*आज पाठविलेले स्वॅब - 54

*निगेटिव्ह अहवाल - 48

*पॉजिटिव्ह अहवाल - 03

इंकाँकलुसिव्ह अहवाल-01

रिजेक्ट अहवाल-02

बीड : दिलासा आजच्या 108 पैकी 107 निगेटिव्ह

बीड: दिलासा 108 पैकी 107 निगेटिव्ह

 

बीड दि.30 ( सिटीझन ) कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी आज मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 10,  कोविड केअर सेंटरमधून 62 यासह एकूण 108 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यासर्व व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून 108 पैकी 107 निगेटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली असून 1 अनिर्णित असल्याचे सांगितले.  दरम्यान आज एकही पॉझिटिव्ह न आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 

*कोविड 19/बीड/ अपडेट /30/06/2020*

आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या-- 108*

*पॉजिटिव्ह अहवाल---00* 

बीडला धक्का ; आज 5 पॉझिटिव्ह

 

बीड : धक्का , आज 5 पॉझिटिव्ह 

 

बीड दि.29 ( सिटीझन ) कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 10,  ग्रामीण रुग्णालय आष्टी 09, ग्रामीण रुग्णालय माजलगाव 04, स्वाराती ग्रा. वै. महाविद्यालय आंबाजोगाई 14 याप्रमाणे एकूण 37 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यासर्व स्वॅबचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून 37 पैकी 5 रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 32 निगेटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान गेल्या सहा दिवसांपासून सर्व रिपोर्ट निगेटिव्ह येत असल्याने दिलासा मिळाला होता मात्र आज 5 पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. 

बीड जिल्ह्यात आजही सर्व रिपोर्ट निगेटिव्ह

बीड जिल्ह्यात आजही कोरोनाला ब्रेक

बीड, (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील विविध रूग्णालयातून आज रविवारी 18 व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सर्व अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून 18 पैकी 18 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना पुन्हा दिलासा मिळाला आहे.

 

बीडमधील विप्रनगरमध्ये कंटेंनमेंट झोन घोषित

बीड दि.27 ( सिटीझन ) शहरातील विप्रनगर, बीड शहर येथे एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याचे डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, औरंगाबाद यांच्या दुरध्वनी संदेशाद्वारे माहीती प्राप्त झाल्यामुळे, बीड शहरातील विप्रनगर येथील श्रीकिशन जेथलिया यांचे घर ते ज्ञानोबा माऊली मुंडे यांचे घरापर्यंतचा Containment zone जाहीर करणे आवश्यक असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी संदर्भ ११ अन्यये सादर केला आहे.

बीड : चौथ्या दिवशीही दिलासा

बीड जिल्ह्याला आजही दिलासा 

बीड दि. 26 ( सिटीझन ) जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज शुक्रवारी 19 व्यक्तींचे स्वॅब  तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील 5 , अंबाजोगाईतील 10 व अन्य 4 अशा 19 स्वॅबचा समावेश होता.19 अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून 19 पैकी 18 निगेटिव्ह  आले आहेत.तर 1 पॉझिटिव्ह आला असून तो अंबाजोगाई ( गिरवली , ता.भूम , जि उस्मानाबाद ) येथील रुग्णालयातील आहे.  

Pages