बीड शहर

- पोलिस आणि महसुलने वाळू माफियांकडे दुर्लक्ष केले मात्र आता पालकमंत्र्यांनीच लक्ष घातले! ना.धनंजय मुंडेंनी दिल्या कडक कारवाईच्या सुचना

मुंबई, (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या तसेच त्यातून घडलेल्या अपघातांच्या तक्रारी गंभीर असून पोलीस व महसूल प्रशासनाने अशा वाळू माफियांविरुद्ध तातडीने कडक कार्यवाहीचे सत्र सुरू करावे असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हा पोलिस व महसूल प्रशासनास दिले आहेत.
महसूल किंवा पोलीस खात्यातील कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी वाळू माफियांना पाठीशी घालत असल्याचा प्रकार जर उघडकीस आला तर त्याची अजिबात गय केली जाणार नाही, प्रशासनातील अशा अधिकार्‍यांवर देखील कडक कारवाई करण्यात यावी असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

डॉ. जोगदंडला वाचविण्याच्या प्रयत्नात कार्यकारी अभियंताच गोत्यात

कार्यकारी अभियंता बेद्रे यांना जिल्हाधिकार्‍यांनी पाठवली कारणे दाखवा नोटीस
बीड, (प्रतिनिधी):- वादग्रस्त गुत्तेदार डॉ. जोगदंडच्या डी  बी कन्स्ट्रक्शनला वाचविण्याच्या नादात आता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंताच गोत्यात आले आहेत. कार्यकारी अभियंता ए .एम बेद्रे यांनी डी  बी कन्स्ट्रक्शन ची बिले देताना निष्काळजीपणा दाखविल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सांगत बीडच्या जिल्हाधिकार्‍यांनी कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणात 7 दिवसात खुलासा न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

दर्पणकार कै.बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, जिल्हा माहिती कार्यालय बीड येथे दर्पण दिन साजरा

बीड, (प्रतिनिधी):-दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून  दर्पण दिननिमित्त जिल्हा माहिती कार्यालय बीड येथे त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कै.बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या नियतकालिकाच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांच्या स्मृतीसाठी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

टेम्पो मोटर सायकलची धडक;एक ठार एक जखमी.;दिंद्रुड तेलगाव रस्त्यावरील दुर्घटना.

राज गायकवाड-माजलगाव.

 भरधाव वेगातील टेम्पोने मोटार सायकला दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना तेलगाव दिंद्रुड महामार्गावर रविवार दि. 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

ऊस वाहतूक बैलगाडीला धडकून मोटारसायकल युवक ठार.

 

दुगड पेट्रोल पंपासमोरील घटना.

माजलगाव प्रतिनिधी दि.25

साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात असलेल्या ऊस वाहतूक बैलगाडीला मोटरसायकल स्वराने धडक दिली.या अपघातात चालक युवक जागीच ठार झाला असून शुक्रवार दिनांक 25 रोजी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 61 वर दुगड पेट्रोल पंपासमोर घडली.

डॉ. माजेद काझी यांना पितृशोक

डॉ. माजेद काझी यांना पितृशोक 

बीड दि.27 ( प्रतिनिधी ) येथील डॉ. माजेद काझी यांचे वडील तथा जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी काझी जैनुलआबेदीन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 83 वर्षांचे होते. आज शुक्रवारी रात्री 10 वाजता तकीया मस्जिद परिसरातील कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. 
बीड शहरातील डॉ. माजेद काझी यांचे वडील 
काझी जैनुलआबेदीन हे जिल्हा परिषदेच्या अकाउंट विभागात कार्यरत होते. मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांच्या पश्चात 2 मुले , पाच मुली असा परिवार आहे. काझी कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे. 

आष्टी : बिबट्याचा हल्ल्यात पंचायत समिती सदस्यपती ठार

आष्टी : बिबट्याचा हल्ल्यात पंचायत समिती सदस्यपती ठार 

आष्टी दि.23 ( प्रतिनिधी ) येथील पंचायत समिती सदस्य पती नागनाथ गर्जे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी पाटसरा ( ता.आष्टी ) येथे  घडली. सदरील घटनेने जिल्हा हादरला असून प्रचंड भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे. 

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू करा ; खा.प्रितमताईंच्या जिल्हाधिकारी, विभागीय प्रबंधकांना सूचना

सोमवारपासून सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडणार - मुख्यमंत्री

बीड दि.14 ( प्रतिनिधी ) : दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील जनतेला गिफ्ट दिलं आहे. दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरं आणि प्रार्थनस्थळं उघडण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. मात्र भाविकांना यावेळी कोरोनाच्या नियमांचं म्हणजेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगच पालन करावं लागणार आहे.

 

शेख जुबेर यांना पितृशोक

बीड दि.10 ( प्रतिनिधी ) शहरातील जमजम कॉलनी येथील रहिवासी आणि नगर पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी शेख खुर्शीद अहेमद यांचे आज मंगळवारी दुपारी 1 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 66 वर्षांचे होते. 
बीड येथील आयडिया सेल्युलरचे शेख जुबेर भाई यांचे ते वडील होते. आज मंगळवारी रात्री 8 वाजता ( ईशाच्या नमाज नंतर ) तकीया मस्जिद परिसरातील कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले , एक मुलगी , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. शेख कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.

बीडमधील एलआयसी ऑफिसला भीषण आग

बीडमधील एलआयसी ऑफिसला भीषण आग 

बीड दि.9 ( प्रतिनिधी ) शहरातील नगर रोडवरील एलआयसी ऑफिसला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत पूर्ण ऑफिस जाळून खाक झाले असून प्रचंड नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठले होते. 
बीड शहरातील एलआयसी ऑफिसला आज पहाटे भीषण आग लागली. पहाटेची वेळ असल्याने आग पूर्ण ऑफिसमध्ये पसरली. आग एव्हढी भीषण होती की ऑफीसमधील साहित्याच्या अक्षरशः कोळसा झाल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र ऑफिसचे प्रचंड नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. 

नगराध्यक्षपदासाठी शेख मंजूर यांचा मार्ग मोकळा

नगराध्यक्षपदासाठी शेख मंजूर यांचा मार्ग मोकळा.

प्रतिस्पर्धी उमेदवार सौ.मेंडके यांनी घेतली निवडणुकीतून माघार.

राज गायकवाड-माजलगाव.

माजलगाव नगराध्यक्षपदासाठीचा शेख मंजूर यांचा मार्ग प्रतिस्पर्धी उमेदवार सौ रेश्मा दीपक मेंडके यांनी अचानक माघार घेतल्याने मोकळा झाला आहे.भाजपाच्या सौ मेंडके यांनी आपल्या चार सहकाऱ्यांच्या पाठींब्यावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता.आज नाट्यमय त्यांनी फॉर्म काढून घेतल्याने होऊ घातलेली  निवडणूक बिनविरोध होणार असून शेख मंजूर हे नगराध्यक्षपदी  विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगराध्यक्ष चाऊस विरुद्ध अविश्वास दाखल करणाऱ्या सर्वपक्षीय 19 नगरसेवकांत फुट

नगराध्यक्ष चाऊस विरुद्ध अविश्वास दाखल करणाऱ्या सर्वपक्षीय 19 नगरसेवकांत फुट.

बहुमताचा आकडा पार करत रा.कॉ.  टीम अज्ञातस्थळी रवाना.

पालिकेतील घडामोडींना  आला वेग.

राज गायकवाड | माजलगाव

भगवान भक्तीगड यावर्षी पुरता आपल्या गावी घेऊन जा - पंकजाताई

भगवान भक्तीगड यावर्षी पुरता आपल्या गावी घेऊन जा - पंकजाताई 

बीड दि.22 ( प्रतिनिधी ) आजपर्यंत आपण संख्येचा , गर्दीचा विक्रम मोडला मात्र यंदा कार्यक्रमाचा उच्चांक स्थापित करू. भक्ती आणि शक्तीची परंपरा यावर्षीही कायम राहणार असून दसरा मेळावा होणार मात्र त्याचे स्वरूप आधुनिक असेल असे स्पष्ट करत गडावर येऊ नका. आपला भगवान भक्तीगड यावर्षी पुरता आपल्या गावी घेऊन जा. भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि सीमोल्लंघन करा असे आवाहन माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज एका व्हिडिओतुन केले आहे. दसरा मेळाव्यात ऑनलाईन मार्गदर्शन करणार असल्याचेही पंकजाताईंनी सांगितले. 

बीड जिल्ह्यात आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी , दुकानेही रात्री 9 पर्यन्त सुरू राहणार

बीड जिल्ह्यात आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी , दुकानेही रात्री 9 पर्यन्त सुरू राहणार

बीड दि. 14 ( प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज बुधवारी आदेश काढून कंटेंनमेंट क्षेत्राबाहेरील आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील दुकाने आता रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. गार्डन आणि पार्क खुली करण्यास परवानगी देण्यात आली।आहे. 
वाचा खालील सविस्तर आदेश 

आशियाना हॉटेलचे मालक अरशियान सेठ यांचे निधन

आशियाना हॉटेलचे मालक अरशियान सेठ यांचे निधन 

बीड दि.11 ( प्रतिनिधी ) शहरातील बशीरगंज भागातील प्रसिद्ध हॉटेल अशियानाचे मालक अरशियान सेठ ( अरशद सेठ ) यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. काही महिन्यापूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते, त्यांनतर आज अरशियान सेठ यांच्या निधनाने कुटुंबावर दुःख कोसळले आहे. कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.  

बीड जिल्ह्यातील कोरोना शंभरच्या आत

बीड: आज शंभरच्या आत रुग्ण
बीड, (प्रतिनिधी):- जिल्हा प्रशासनाला आज गुरुवार दि.8 ऑक्टोबर रोजी प्राप्त झालेल्या 885 अहवालापैकी 94 पॉझिटिव्ह तर 791 निगेटिव्ह आले आहे. बीड तालुक्यात 24, अंबाजोगाई 19, आष्टी 9, धारुर 9, गेवराई 6, केज 6, माजलगाव 4, परळी 9, पाटोदा 3, शिरुर 3, वडवणी तालुक्यात 2 रुग्ण आढळले आहे.

 

Pages