बीड शहर

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नोंदणीची गरज नाही , आता रुग्णालयाकडून ईमेलद्वारे होणार मागणी

 

बीड दि.30 ( प्रतिनिधी ) रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आता उद्या दि.1 मे पासून आयटीआयमध्ये नोंदणी करायची गरज नाही. कारण प्रशासनाने संबंधित रुग्णालयांनाच इमेल द्वारे मागणी नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा त्रास दूर होणार आहे. 

ऑक्सिजन बंद झाल्याने बीडमध्ये दोन रूग्णांचा मृत्यू ;सखोल चौकशी करा - पंकजाताई मुंडे

 

बीड 
अचानक ऑक्सिजन बंद झाल्याने दोन रूग्णांचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे, या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

लसीचा डोस घेण्यापुर्वी रक्तदान करा - कृष्णा फरताळे

बीड (प्रतिनिधी);- देशभरात 1 मे पासुन 18 वर्षाच्या पुढील वयोगटातील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. एकदा लसीकरण झाल्यानंतर पुढचे 60 दिवस रक्तदान करता येत नाही. म्हणुन ज्यांना शक्य आहे त्यांनी लसीचा डोस घेण्या अगोदर रक्तदान करावे आणि मगच लस घ्यावी. जेणेकरून लसीकरण प्रक्रियेनंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होणार नाही असे आवाहन स्व.राहुल भैय्या फरताळे युवा प्रतिष्ठाणचे व युवासेनेचे कृष्णा फरताळे यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात येणार 10 हजार रेमडेसीविर इंजेक्शन

गुड न्युज : धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यात येणार 10 हजार रेमडीसीविर

परळीत येणार 3000 रेमडीसीविर, खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजूंना 'नाथ प्रतिष्ठान' देणार मोफत रेमडीसीवीर

परळी दि.16 ( प्रतिनिधी )---- : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी व कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडीसीविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी नातेवाईकांची होणारी धावपळ थांबावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून 10 हजार रेमडीसीविर जिल्ह्यात उपलब्ध होणार आहेत.

दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली, कोरोना संकटांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे.

सावधान!महिलांच्या गळ्यातील सोने काढून घेणारी टोळी सक्रिय

शहरात महिलामार्फत भुरळ पाडून 6 महिलांना लुबाडण्याची घडली घटना.

जुन्या वस्तू घेऊन नव्या वस्तू देतो म्हणत केल्या जाती ओळख.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याची केली टाळाटाळ.

राज गायकवाड-माजलगाव.

 

बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन मागे - जिल्हाधिकारी

बीड दि.4 ( प्रतिनिधी ) जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊनचा कालावधी आज मध्यरात्री पूर्ण होत असल्याने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी नवीन आदेश जारी केले आहेत. उद्यापासून लॉकडाऊन उठविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. दहा दिवसांचा लॉकडाऊन काळातील निर्बंध मागे घेण्यात आल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी जगताप यांनी काढले आहेत. मात्र नियम पाळणे बंधनकारक केले आहे.सर्व शाळा , कोचिंग बंद असणार असून दहावी ,बारावीचे वर्ग 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. लग्नासाठी 50 व्यक्तीला परवानगी असेल मात्र त्यांना कोरोना टेस्ट करणे आवश्यक असेल असे आदेशात म्हटले आहे. 

राज्यात शनिवार , रविवार पूर्ण लॉकडाऊन

मुंबई - राज्यात आता शनिवारी आणि रविवारी पुर्णपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 पासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला असून मास्क लावणं आणि नियम पाळणं बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना ही माहिती दिली. राज्यात विकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदरील निर्बंध हे 30 एप्रिल पर्यंत असणार आहेत. सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.

माजी आ. धोंडे म्हणाले, लॉकडाऊनला विरोध चुकीचा

आष्टी दि.26 ( प्रतिनिधी ) कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक असून लॉकडाऊनला विरोध करणे चुकीचे असल्याचे भाजपचे माजी आ.भीमसेन धोंडे यांनी आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.दरम्यान आज सकाळी भाजप आ. सुरेश धस यांनी स्वतः रस्त्यावर उतरून बंद दुकाने उघडण्यास सांगितले व लोकांनी प्रतिसाद देत दुकाने उघडली त्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

माजलगाव तहसीलमध्ये कोतवालाने सहकारी महिलेची काढली छेड!

विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.

 

राज गायकवाड माजलगाव.

 

माजलगाव तहसील मध्ये कार्यरत असणाऱ्या एका कोतवालाने कार्यालयातच आपल्या सहकारी महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड केल्याची घटना 9 मार्च रोजी घडली. दरम्यान पीडित महिलेने गुरुवार दिनांक 25 रोजी कोतवाला विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

बीड जिल्ह्यात उद्या रात्री पासून दि. 4 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर - जिल्हाधिकारी

 

‌बीड दि.24 ( प्रतिनिधी ) अखेर जिल्हा प्रशासनाने आज अधिकृतपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 25 मार्च रोजी रात्री 12 पासून दि.4 एप्रिल रात्री 12 पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबतची अधिकृत घोषणा केली.

बीड जिल्ह्यातील हॉटेल , रेस्टॉरंट , टपऱ्या 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्यास पर्वाणगी- जिल्हाधिकारी

 

बीड दि.16 ( प्रतिनिधी )जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट ,बार ,पान टपऱ्या पुर्णतः बंदचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. आज यामध्ये बदल करण्यात आला असून हॉटेल्स , रेस्टॉरंट, बार, पान टपऱ्या 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत सुरू करण्यास जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दि.16 मार्च रोजी परवानगी दिली आहे. मंगलकार्यालये, फंक्शन हॉल दि.18 मार्च पासून बंदचे आदेश होते. मात्र आता त्यातही बदल करण्यात आले असून सर्व मंगल कार्यालये , फंक्शन हॉल मध्ये 50 व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर होम आयसोलेशनला देखील सर्व नियमासह परवानगी देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील हॉटेल , रेस्टॉरंट , टपऱ्या 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्यास पर्वाणगी- जिल्हाधिकारी

 

बीड दि.16 ( प्रतिनिधी )जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट ,बार ,पान टपऱ्या पुर्णतः बंदचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. आज यामध्ये बदल करण्यात आला असून हॉटेल्स , रेस्टॉरंट, बार, पान टपऱ्या 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत सुरू करण्यास जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दि.16 मार्च रोजी परवानगी दिली आहे. मंगलकार्यालये, फंक्शन हॉल दि.18 मार्च पासून बंदचे आदेश होते. मात्र आता त्यातही बदल करण्यात आले असून सर्व मंगल कार्यालये , फंक्शन हॉल मध्ये 50 व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर होम आयसोलेशनला देखील सर्व नियमासह परवानगी देण्यात आली आहे.

Pages