मांजरसुंभा महामार्ग पोलिसांनी वेळीच दुरुस्ती केल्याने ऑक्सिजन टँकर वेळेवर पोहचले

बीड ( प्रतिनिधी ) बीड येथे हॉस्पिटलकरीता येणारे ऑक्सिजन टँकरमध्ये जामखेडजवळ दोन वेळा बिघाड झाला. मात्र मांजरसुंभा महामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दुरुस्ती केल्याने ते टॅंकर बीडकडे रवाना झाले.

 

बीड हॉस्पिटलासाठी oxygen tanker हे पुणे चाकण येथून रात्री उशिरा निघाले होते. ते आणण्यासाठी बीड येथून रोज 1 पोलीस अधिकारी आणि काही कर्मचारी तसेच महसूलचे अधिकारी इस्कॉरटिंग करीत टँकर सुरक्षित व वेळेत आणण्याकरिता पुणे येथे जातात. टँकर सोबत घेऊन येतात यांना वाहतुकीस काही अडचण येऊ नये म्हणून महामार्ग पोलीस विभाग महाराष्ट्र राज्य यांचे आदेशाने महामार्ग पोलीस विभाग केंद्र मांजरसुंभा तर्फे देखील महामार्गहद्दी मध्ये सदर ऑक्सिजन वाहतुकीस काही अडथला येऊ नये म्हणून रस्ता मोकळा ठेऊन मदत केली जाते. सोमवारी महामार्गचे पोउपनि. घोडके सोबत चालक पो. ना. बांगर , पोना.नरवणे, पोह राठोड, पोकॉ. उबाळे ड्युटीवर असताना सदर टँकर इस्कॉरटिंग करण्यासाठी जामखेड पर्यंत गेले होते. त्याचवेळी एक टँकर क्र. MH04 - FU. 2189 हा टँकर पुणे वरून निघाला असता पहाटे 5 .00वाजता जामखेड येथे वाहनांमध्ये बिघाड झल्याने बंद पडला होता. तेव्हा तत्परता दाखवून महामार्ग पोलीस केंद्र मांजरसुंभा येथील पोलीसांनी तात्काळ लॉकडाऊन असताना देखील एका मॅकेनिकला शोधून बोलावून घेतले आणि टँकर दुरुस्ती साठी लागणारे सामान ऑटोमोबाईल दुकान मालकास कॉल करून दुकान उघडून घेतले. मॅकेनिकनेही जास्त विलंब न लावता टँकर कमी वेळात दुरुस्त करून दिले. त्यामुळे टँकर नियोजित ठिकाणी रवाना करता आले. पुढे आणखी काही अडचण येऊ नये म्हणून मॅकेनिकला सोबत घेतले. परंतु पुढे आणखी 12 किमी वर गेल्यावर सौताडाघाट चढून आल्यावर पुन्हा सदर टँकरमध्ये बिघाड झाल्याने आणखी काही दुरुस्तीसाठीचे समान जामखेड येथून तात्काळ आणून पुन्हा टँकर दुरुस्त करून बीडच्या दिशेने रवाना करण्यात आले व सदर टँकर सुखरूप नियोजित ठिकाणी पोहचले. महामार्ग पोलिसांनी वेळेत मदतीसाठी धावून आल्याने व टँकर वेळेत पोहचण्यास मदत केली म्हणून मॅकेनिकला 500 रुपये बक्षीस दिले. या कामासाठी धावून महामार्ग पोलीस केंद्र मांजरसुंभाचे पोउपनि. घोडके, पोह. राठोड , पोना. बांगर , पोना. नरवणे, पोकॉ. उबाळे जामखेड येथील एक मॅकेनिक , फिट्टर/ऑटोमोबाईल दुकान मालक 

बीड पोलिस इस्कॉरटिंग ग्रुप पीएसआय जोगदंड व त्यांची टीम आणि नायब तहसीलदार मोरे आदींनी परिश्रम घेतले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.