Add new comment

बीडचे प्रभारी सीएस म्हणून डॉ. साबळे घेणार आजच पदभार

बीडचे प्रभारी सीएस म्हणून 
डॉ. साबळे आजच घेणार पदभार 

बीड ( प्रतिनिधी ) जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते यांच्या जागी डॉ. साबळे हे आज दि. 10 जून रोजी शल्य चिकित्सक पदाचा पदभार घेणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. दरम्यान सध्याचे शल्यचिकित्सक डॉ.गित्ते यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्याकडे लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयाची जबाबदारी दिल्याचे समजते.
बीड जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा प्रभारी चार्ज माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.साबळे यांना देण्यात आला आहे. डॉक्टर गीते यांच्या जागी डॉक्टर साबळे हे आज  दिनांक 10 जून रोजी शल्यचिकित्सक पदाचा पदभार घेणार असून ते माजलगावकडून बीडकडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.