बीडमध्ये पोलीस बंदोबस्तात 10 टन ऑक्सिजन लिक्विड दाखल

बीडमध्ये पोलीस बंदोबस्तात 10 टन ऑक्सिजन लिक्विड दाखल 

बीड दि.22 ( प्रतिनिधी ) चाकण येथून Air Liquid कंपनीचा 10 टनाचा लिक्वीड ऑक्सिजन टँकर पोलीस बंदोबस्तात आज सायंकाळी बीडमध्ये आणण्यात आला. सदर टँकर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशानुसार व अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे ,  उप विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर , बीड तहसीलदार शिरीष वमने यांच्या मार्गदर्शना खाली 10 पैकी  2 टन लिक्विड ऑक्सिजन जिल्हा शासकीय रुग्णालय बीडच्या प्लान्टमध्ये बीड नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांचे निगराणी खाली थेट उतरवण्यात आला. जिल्हाधिकारी जगताप यांच्या नियोजनानुसार दोन टन ऑक्सिजन लिक्विड थेट रुग्णालयातील प्लान्टमध्ये उतरण्यात आल्याने खाजगी प्लान्टवरून 200 सिलेंडरद्वारे रुग्णालयात आणण्यास लागणारा किमान 5 ते 6 तासाचा वेळ वाचणार आहे. रुग्णांना तिथल्या तिथे ऑक्सिजन मिळणार आहे. ऑक्सिजन उतरवून घेताना नायब तहसिलदार सुरेंद्र डोके ,  संजय राऊत ,  पोलीस उप निरीक्षक अंधारे  व वाहन चालक भारत मुळूक उपस्थित होते. दरम्यान 10 टन ऑक्सिजन लिक्विडपैकी येथील दोन प्लांट एजन्सीला प्रत्येकी 4 टन आणि थेट जिल्हा रुग्णालयात 2 असा एकूण 10 टन ऑक्सिजन लिक्विड उतरवून घेण्यात आला.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.