बीड शहर

महावितरणाच्या कर्मचार्‍यास मारहाण

बीड : चुकीची जोडणी असणारे विद्युत मीटर दुरुस्त करणाऱ्या महावितरणच्या तंत्रज्ञास घरमालकाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बीड तालुक्यातील माळापुरी येथे घडली.
 

एका भावाकडील वसुलीसाठी दुसऱ्या भावाचे अपहरण

 केज : एका भावाकडील वसुलीसाठी मुकादमाने दुसऱ्या भावाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील गौरवाडी येथे घडली. 

कोल्हापूर पंचगंगा पुलावरून मिनी बस कोसळली; अपघातात १३ ठार

आज (शनिवार २७ जानेवारी) सकाळी सात वाजता एका बालकाचा मृतदेह मिळाला आहे.

स्वबळावर केज मतदार संघात कोणीच सक्षम नाही

अंबाजोगाई (प्रतिनिधी) ः कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना कोणत्याच पक्षाला मानणारा वर्ग मतदार संघात नसुन व्यक्तिनिष्ठेला मतदार संघात प्राधान्य असल्याने पक्ष म्हणून कुणाचीच ताकद नाही. उमेदवारावर युती अथवा आघाडी ठरते. मतदारही त्यालाच प्राधान्य देत असल्याने पक्ष म्हणून मतदार संघात कोणीच सक्षम नाही.

बीडची सुशिक्षीत बेरोजगारांची परिषद अस्मितेची नाही तर अस्तित्वाची-सुभाष वारे

बीड (प्रतिनिधी) अभी नही तो कभी नही असा नारा देत आज नगर रोड येथील आंबेडकर भवनात सुशिक्षीत बेरोजगार परिषदेचे आयोजन सुराज्य सेना आणि अभिव्यक्त ग्रुप यांच्यावतीने करण्यात आले. या बेरोजगार परिषदेत नांदेड येथील फारूक अहेमद, सुभाष वारे पुणे, योगेश जाधव नांदेड, यांची उपस्थिती होती. भ्रष्टाचार निर्मुलनचे कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना फारूक अहेमद म्हणाले की, जातीधर्माच्या नावाखाली व्यवस्था युवकांना भरकावटत आहे.

चंदन पठाणसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना जिजाऊ रत्न पुरस्कार

बीड (प्रतिनिधी) निर्भिड पत्रकार संघ आयोजीत जिजाऊ रत्न पुरस्कार वितरण समारंभ २०१८ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आ.जयदत्त क्षिरसागर, डिवायएसपी खिरडकर, संपादक विजयराज बंब, खालेक पेंटर, काझी मकदुम, शेख मुजीब, काळकुटे, ऍड.शेख शफीक, रुचीता मलबारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पोलिस, पत्रकार, शिक्षक, सामजिक कार्यकर्ते यांना जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर दोन बसची धडक

बीड (प्रतिनिधी) शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या पाटोदा-परळी बसला पाठीमागून आलेल्या औंरगाबाद-सांगली बसने जोराची धडक दिल्याने यामध्ये १२ जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.

परळी धर्मापुरी रोडवर अपघात

परळी पासुन जवळच असलेल्या धर्मापुरी रोडवर अपघात 
खोडवा सावरगाव येथील एकाचा जागिच मृत्यू वाहनाने उडवुन गेल्याची घटना राञी ९ च्या सुमारात घडली या अपघातात खोंडवा सावरगाव येथील युवक जागीच ठार झाला असुन परळी ग्रामीण पोलीस घटना स्थळी दाखल झाली अाहे

लाॅयन्स क्लब परळी च्या सदस्यपदी सय्यद सिराज यांची निवड

26 जानेवारी गणतंत्र दिवसाचे अवचित साधुन लाॅयन्स क्लब परळी चे अध्यक्ष डाॅ.संतोष मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सय्यद सिराज यांची लायन्स क्लब च्या सदस्यपदी सर्वोमताने निवड करण्यात आली यावेळी डाॅ.दिपक पाठक,डाॅ.सतीश गुट्टे,बाळु सेठ लड्डा,डाॅ.अर्शद शेख,डाॅ.मुकुंद सोळंके,डाॅ.दिनेश लोढा,निरज कुचेरीया,महेश भंडारी,अशोक कांकरीया,डाॅ.राजेश जाजु, डाॅ.विनोद जगतकर, गौरव जाजु,पिंटु सारडा,डाॅ.अशोक मकर,अॅड.प्रकाश मुंडे,समाधान मुंडे,जयदत्त नरवटे,व सर्व पदअधिकारी उपस्थित होते.

विधीमंडळ पञकार संघाच्या अध्यक्षपदी- सपाटे

बीड-मंत्रालय व विधीमंडळ पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बीड जिल्याचे भुमिपुत्र.दिलीपरावजी सपाटे यांची फेर निवड झाली अाहे

धांडेगल्लीत युवकाची अात्महत्या

बीड(प्रतिनीधी) शहरातील तेरवी लाईन धांडे गल्लीत अाज सकाळी एका २२ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेउन अात्महत्या केल्याची घटना घडली 

बीड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

बीड नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समवेत मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, सर्व नगरसेवक, कर्मचारी आदी उपस्थित होते.

 
 

Pages