बीड शहर

शिक्षक बदल्यांची प्रक्रिया दोन दिवसात ; जिल्हांतर्गत बदल्यांना आतापासूनच सुरूवात

बीड (प्रतिनिधी) जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया दोन दिवसात सुरू होत आहे. दि.१ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या प्रक्रियेची कार्यपध्दती आज दिवसभरात स्पष्ट होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान गतवर्षी बदल्यांचा गोंधळ आणि लांबलेली प्रक्रिया यामुळे प्रशासनाने सावध पावित्रा घेत आतपासूनच प्रक्रियेला सुरूवात केली आहे.

बिंदुसरेच्या पात्रात पायाखोदणी पुल बांधणीच्या कामाला वेग

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील बिंदुसरा नदीवरील जुना पुल पाडण्याचे काम पुर्ण झाले असून आजपासून पायाखोदणीला सुरूवात झाली आहे. दि.१० फेब्रुवारीला पुल उभारणीच्या कामाचे भुमिपुजन होणार असल्याने कामाला गती मिळू लागली आहे.

मंत्रालयात विष प्राशन केलेल्या धर्मा पाटील यांचे अखेर निधन

मुंबई (वृत्तसेवा) भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरून आठवड्याभरापूर्वी मंत्रालय परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचे अखेर रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वडिलांचे पार्थिव ताब्यात घेणार नसल्याचे पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

महामंडळावरील नियुक्त्यांना ग्रीन सिग्नल; बीड जिल्ह्यातून लॉबींग!;भाजपकडून आडसकर, पोकळे यांच्या नावाची चर्चा तर सेनेकडूनही चाचपणी; शिवसंग्रामलाही वेध

मुंबई : राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर यापूर्वीच्या विविध महामंडळावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या असता, या निर्णयाला महामंडळांवरील पदाधिकार्‍यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे महामंडळाच्या नियुक्त्या होण्यास विलंब झाला होता. मात्र आता महामंडळावरील नियुक्त्यांना ग्रीन सिंग्नल मिळाल्याने पदाधिकारी आणि आमदारांनी महत्वाच्या महामंडळासाठी लॉबींगला सुरूवात केली आहे. दरम्यान महामंडळासाठी बीड जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनीही फिल्डींग लावली आहे.

परिक्षेत पास झाले तरच सरपंचांना सहिचा अधिकार - पवार

अहमदनगर (प्रतिनिधि)
राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला असून आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच जनतेतुन निवडले आहेत. या सरपंचांना शासन प्रशिक्षक देणार असुन प्रशिक्षनानंतर परिक्षा घेतली जाणार आहे. या परिक्षेत पास झाले तरच जनतेतुन निवडून आलेल्या सरपंच यांना सहिचे अधिकार दिले जाणार आहेत.याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे मत आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

​निर्भिड पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अपर्णा राठोड

बीड (प्रतिनिधी)ः- निर्भिड पत्रकार संघाच्या संवस्थापक अध्यक्षा रुचिता मलबारी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र अध्यक्ष अनिल घोरड, मराठवाडा अध्यक्ष शेख तालीब जिल्हा अध्यक्ष शेख तय्यब, शेख आमेर,शिवाजी पिंगळे, मुबशीर पठाण,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवार दि. 27 जानेवारी 2018 रोजी विश्राम ग्रह बीड येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्भिड पत्रकार संघाच्य बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी अपर्णा राठोड यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

​'पर्यटन' पर्वाचा शुभारंभ- आ. विनायक मेटे​ 

बीड प्रतिनिधी ः-  बीड शहरापासुन जवळच असलेल्या बिंदुसरा तलावा नजिक युवा शांतीवन हे ठिकाण पर्यटन क्षेत्र म्हणुन विकसीत व्हावे या साठी गेल्या अनेक महिन्यापासुन आ. विनायक मेटे हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. आज त्याचाच एक भाग म्हणुन वनविभागा मार्फत बिंदुसरा तलावा मध्ये पर्यटकांसाठी बोटींगची सेवा आ. विनायक मेटे यांच्या शुभ हस्ते व विभागीय वनधिकारी अमोल सातपुते, राजेंद्र मस्के, प्रभाकर कोलंगडे, डॉ. रमेश पानसंबळ,  भारत काळे, अनिल घुमरे,  प्रकाश पिंगळे, रामहारी मेटे, ज्ञानेश्‍वर कोकाटे, बबन माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा सुरू करण्यात आली.

जिल्ह्यात पल्स पोलियो मोहिम यशस्वी- जिल्हा अारोग्य अधिकारी

बीड-पल्स पोलिओ मोहीम २८ जानेवारी २०१८ चे उदघाटन डाॅ बी.डी पवार सहसंचालक अारोग्य सेवा मुंबई अध्यक्षा सवीता गोल्हार ,मुख्यधिकारी जि.प.बीड यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाशल्यचिकीत्सक डाॅ अशोक थोरात व जिल्हा अारोग्य अधिकारी डाॅ राधाकीसन पवार, ईतर अधिकारी उपस्थीत होते

पत्रकारांनी निर्भिडपणे लिखान करावे-आ.क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी) स्पर्धेच्या युगामध्ये सोशल मिडीया प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असले तरी मुद्रीत माध्यमांनी विश्‍वासार्हता टिकवून ठेवली आहे. पत्रकारांनीही निर्भिडपणे लिखान करावे असे आवाहन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले. तर मराठवाड्यातील पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. माध्यमांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असे आवाहन ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, विजयराज बंब यांनी केले.

चोर्‍याच चोर्‍या चोहीकडे..गेले पोलिस कोणीकडे..?

बीड (प्रतिनिधी) शहरातील चोर्‍यांची मालिका सुरूच असुन दोन दिवसापूर्वीच झमझम कॉलनी आणि चाणक्य पुरी भागात झालेल्या चोर्‍यानंतर काल भरदुपारी एका वरिष्ठ लिपीकाचे घर फोडून पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. मध्यवस्तीत होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. चोर्‍याच चोर्‍या चोहीकडे...आणि गेले पोलिस कोणीकडे..? असेच म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे.

नांदेडमध्ये बिटकॉईन कंपनीचा अनेकांना कोट्यवधींचा गंडा, गुन्हा दाखल

नांदेड (वृत्तसेवा) गेन बिटकॉईन कंपनीने नांदेडमधील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आता या प्रकरणात नांदेडमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये बिटकॉईनचं आकर्षण दिसून येत आहे. मात्र आता यामध्ये फसवणूक होत असल्याचंही समोर आलं आहे.

जामखेडला मोटारसायकल चोरीचे रॅकेट?

जामखेड( प्रतिनिधी)जामखेड तालूक्यात चोरीच्या मोटारसायकल शोधार्थ पूणे शहर उपायूक्तालयाच्या आदेशावरून हडपसर पूणे येथून पोलीस निरीक्षक एम बी भांगे यांच्या पथकाने जामखेड तालुक्यात मोटारसायकल चोरीच्या रँकेटचा पर्दाफाश करत ११ मोटारसायकल पकडल्या  आहेत.

बीड बाजार समीतीच्या ३५ गाळ्यांचे आ जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 बीड (प्रतिनिधी )येथील कृषी उत्पन बाजार समीतीने स्वनिधितून बांधलेल्या ३ कोटी ५८ लक्ष रुपयाच्या ३५ गाळ्यांचे उद्घाटन दि ३१ जानेवारी रोजी लोकनेते आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते होणार असल्याची माहीती सभापती दिनकर कदम यांनी दिली आहे. 

बीडमध्ये भरदुपारी कलार्कचे घरफोडले ; ३ लाख लंपास

बीड- बीड येथील शिवाजीनगर हद्दीतील मिञ नगर भागात दुपारी  ४ च्या सुमारास चोरांनी घरामध्ये प्रवेश करुन डल्ला मारला मिञ नगर भागातील अायटिया मध्ये असलेले कलार्क सुभाष दगडूबा अासवले यांच्या घरातील ४० हजार नगदी व १० तोडे सोन्  चोरट्याने लंपास केला

कर्जबाजारी शेतकर्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यु

बीड - कानोबाचीवाडी शिरुर येथील एका ६५ वर्षीय शेतकर्‍याने दि १९ जानेवारी २०१८ रोजी सांयकाळी बॅकेचे कर्ज ,नापिकीला कंटाळुन स्वत्हाच्या शेतात विषारी औषद प्राशन केले होते उपचारा दरम्यान अाठ दिवसाने त्यांचा मृत्युझाला 
 

महावितरणाच्या कर्मचार्‍यास मारहाण

बीड : चुकीची जोडणी असणारे विद्युत मीटर दुरुस्त करणाऱ्या महावितरणच्या तंत्रज्ञास घरमालकाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बीड तालुक्यातील माळापुरी येथे घडली.
 

एका भावाकडील वसुलीसाठी दुसऱ्या भावाचे अपहरण

 केज : एका भावाकडील वसुलीसाठी मुकादमाने दुसऱ्या भावाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील गौरवाडी येथे घडली. 

कोल्हापूर पंचगंगा पुलावरून मिनी बस कोसळली; अपघातात १३ ठार

आज (शनिवार २७ जानेवारी) सकाळी सात वाजता एका बालकाचा मृतदेह मिळाला आहे.

स्वबळावर केज मतदार संघात कोणीच सक्षम नाही

अंबाजोगाई (प्रतिनिधी) ः कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना कोणत्याच पक्षाला मानणारा वर्ग मतदार संघात नसुन व्यक्तिनिष्ठेला मतदार संघात प्राधान्य असल्याने पक्ष म्हणून कुणाचीच ताकद नाही. उमेदवारावर युती अथवा आघाडी ठरते. मतदारही त्यालाच प्राधान्य देत असल्याने पक्ष म्हणून मतदार संघात कोणीच सक्षम नाही.

Pages