जिल्हाकचेरीसमोर हमाल मापाडींचे आंदोलन
बीड, (प्रतिनिधी):- राज्य शासनाच्या कामगार विभागाने १७ जानेवारी २०१८ रोजी शासन निर्णयान्वये राज्यातील ३६ माथाडी मंडळाचे विलीनीकरण करुन राज्याचे एकच माथाडी मंडळ स्थापित करण्यासाठी कमिटी स्थापन केली आहे. या निर्णयाला महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाने विरोध केला असुन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णय मागे घ्या या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजीने जिल्हाकचेरी परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलनात हमाल मापाडी संघटनेचे नेते राजकुमार घायाळ, रामभाऊ बादाडे, हारुण शरीक सय्यद, हनुमान जगताप, नवनाथ माडेकर, ओमप्रकाश नेमाने, बप्पासाहेब जाधव संतोष जोगदंड, मोहन घाडगे, गुरुनाथ जोगदंड, राम मोरे, जगन्नाथ दुधाळ, मुशी बेग, पोपट कांबळे, भिमा नरवडे यांच्यासह हमाल मापाडी मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते.
Add new comment