Add new comment

धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही-इंजि.देवकते

बीड, (प्रतिनिधी):- आघाडी सरकार सत्तेवर असतांना धनगर समाजाला आरक्षण देवू असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर भाजप-सेना सरकारनेही निवडणुकीच्या दरम्यान धनगर समाजाला आरक्षण देवू असे आश्‍वासन दिले होते. मात्र अद्यापपर्यंत आश्‍वासन पुर्ण झाले नाही. धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण गप्प बसणार नसल्याची ग्वाही देत आरक्षणासंदर्भात आरखीन तिव्र आंदोलन उभे करणार असा ईशारा युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.विष्णु देवकते यांनी दिला आहे.
    धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना-भाजप हे दोन्ही सरकारने धनगर समाजाला भुलथापा दिल्या आहेत. आरक्षणाचा प्रश्‍न अद्यापपर्यंत मार्गी लागला नाही. निवडणुकी वेळी आरक्षण देवू असे आश्‍वासन देवून सत्तेवर विराजमान होण्यासाठी धनगर समाजाला आतापर्यंत सरकार भुलथापा देत आल्या आहेत. आता धनगर समाज जागृत झाला असुन भुलथापांना तो बळी पडणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत युवा मल्हारसेना गप्प बसणार नसुन तिव्र आंदोलन उभारुन सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडू असे इंजि.विष्णु देवकते यांनी म्हटले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.