रेशन दुकानदार समीर केके खान यांची निर्दोष मुक्तता ; बदनामीच्या हेतूने दाखल गुन्ह्यातून निर्दोषत्व सिद्ध
बीड ( प्रतिनिधी ) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात समीर खान केके खान यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. रेशन दुकानदार असलेल्या समीर केके खान यांची बदनामी करण्याच्या हेतूने दाखल गुन्ह्यातून मुक्तता झाल्याने त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले आहे.
बीड शहरातील जुना बाजार भागात घडलेल्या एका प्रकरणात तेथिलच रेशन दुकानदार समीर खान केके खान यांच्या विरुद्ध दि. 3 ऑक्टोबर 2013 रोजी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषरोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश वाघ यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीत सबळ पुराव्याअभावी समीर खान केके खान यांची कलम 354 (अ) (आय ) , बालकांचा लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार दाखल गुन्ह्यातून न्यायाधीश वाघ यांनी निर्दोष मुक्तता केली. समीर खान केके खान यांच्या वतीने ऍड. वसंत वडमारे यांनी काम पाहिले. दरम्यान समीर खान केके खान यांची प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्याने त्यांच्यावर दाखल गुन्हा हा खोटा व बदमीच्या उद्देशाने केला होता हे स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे त्यांचे निर्दोषत्व देखील सिद्ध झाले आहे.
Add new comment