नांदूरफाटा येथील अपघातात एक ठार; घातपाताचा नातेवाईकांचा संशय पोलिस ठाण्यात ठिय्या; अंत्यविधी न करण्याचा आक्रमक पावित्रा

नेकनूर (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या नांदूरफाटा येथील रस्त्यावर एका तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. सदरिल प्रकार अपघाताचा असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत असले तरी नातेवाईकांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. तक्रार देवूनही पोलिस घटनास्थळी न गेल्याने संतप्त नातेवाईकांनी नेकनूर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून आरोपीला अटक होईपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीड तालुक्यातील नेकनूर पासुन जवळच असलेल्या नांदूरफाटा येथील रस्त्यावर टेम्पो क्र.(एम.एच२३ डब्लु १९४१) ने चिरडल्याने बप्पा सुभाष काटे (२९, रा.धावज्याचीवाडी ता.बीड) यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. घटनेची चौकशी करण्याची मागणी केली असून पोलिस हेतू परस्पर गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.