Add new comment

शिक्षक बदल्यांची प्रक्रिया दोन दिवसात ; जिल्हांतर्गत बदल्यांना आतापासूनच सुरूवात

बीड (प्रतिनिधी) जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया दोन दिवसात सुरू होत आहे. दि.१ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या प्रक्रियेची कार्यपध्दती आज दिवसभरात स्पष्ट होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान गतवर्षी बदल्यांचा गोंधळ आणि लांबलेली प्रक्रिया यामुळे प्रशासनाने सावध पावित्रा घेत आतपासूनच प्रक्रियेला सुरूवात केली आहे.
शासनाने गतवर्षी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शिक्षक बदल्यांचे नवीन धोरण जाहिर केले होते. मे अखेर पुर्ण बदल्या करण्याचा निर्धार करूनही वेळेत बदल्या पूर्ण झाल्या नाही. न्यायालयीन प्रक्रिया, बदली हवी-नको वाद, तांत्रिक अडचणी या सर्व प्रकारामुळे गतवर्षी बदल्या झाल्याच नाहीत त्यामुळे शासनाने सावध पावित्रा घेत सुधारित वेळापत्रक जाहिर केलेले आहे. सर्व गटशिक्षण कार्यालयाकडून बदली पात्र शिक्षकांची माहिती मागवण्यात आली असुन १ फेब्रुवारीपासून बदली प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.