बीड शहर

चौसाळ्यात घरफोडी

चौसाळा (प्रतिनिधी) येथील नाईकवाडे गल्लीत चोरट्यांनी धुडगूस घालत एकाच रात्री दोन ठिकाणी चोर्‍या केल्या. त्यापैकी एका घरातून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिणे लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे. दरम्यान चोरीच्या घटनेमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

शांतता: खून, दरोडे, लुटमार सुरू आहे! पोलिसांना आव्हान; परप्रांतीय टोळ्या सक्रिय झाल्याचा संशय

बीड (प्रतिनिधी) आष्टी परिसरात दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडत नाही तोच गेवराईतील धोंडराईत अज्ञात दरोडेखोरांनी शेतवस्त्यांवर धुमाकूळ घालत तिघांना बेदम मारहाण केली. मुंडके धडावेगळे करण्याइतपत मारेकर्‍यांची मजल गेली असून केजजवळ अज्ञात दरोडेखोरांनी सराफा व्यापार्‍याची हत्या करत दागिने लुटल्याचा प्रकार घडला. या सर्व घटनांमुळे जिल्ह्यात कायद्याचा धाक आहे की नाही? असा प्रश्‍न सर्व सामान्यांना पडला आहे. दबंग कारवाया करणारे अधिकारी आणि प्रशासन कुठे गेले?

गेवराईत उद्या ना.धनंजय मुंडे करणार गारपीट भागाचा दौरा

महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे उद्या गेवराई तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. तालुक्यातील खळेगाव, उमापूर व धोंडराई भागातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी ते सुसंवाद करणार आहेत. धोंडराई येथे गावालगतच्या वस्तीवर पडलेल्या दरोड्याच्या ठिकाणी ना.मुंडे भेट देणार आहेत. त्यांचे समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण यांच्याकडून बशीरगंज रस्ता कामाची पाहणी; जोड रस्त्यांचे भुमीपूजन

बीड (प्रतिनिधी) नगर पालिकेच्यावतीने शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून रस्त्यांचा विकास होवू लागला आहे. त्यांनी आज सकाळी बशीरगंज भागातील रस्ता कामाची पाहणी केली. यावेळी डॉ.भारतभूषण क्षीरसागर, सायं.दै.सिटीझनचे संपादक शेख मुजीब, युवासोबतीचे संपादक शेख ईसाक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जोड रस्त्यांचे नारळ फोडून भूमीपूजन करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील शिवालयांमध्ये ‘हर हर महादेव’ चा जयघोष

बीड (प्रतिनिधी) महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाभरातील शिवालयामध्ये आज हर हर महादेवचा जयघोष झाला. सकाळपासूनच सर्वच शिवमंदिरामध्ये भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या

वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथील घटना

मराठवाड़ा विभागातील व विदर्भातील गारपीट झालेल्या गावातील शेतकारी ना नुकसान भरपाई द्या -शेख निजाम ,

बीड तालुक्यासह माजलगांव आणि गेवराई तालुक्याला आज सकाळी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसानग्रस्त गावांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावीे असे AIMIM च्या वतीने निवेदन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारीना देण्यात आले

गारपीट नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करावेत आ. विनायकमेटे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

बीड :(प्रतिनिधी) शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांनी जिल्हाधिकारी श्री. एम.डी. सिंह यांची प्रत्यक्ष भेट घेवुन गारपिटग्रस्त भागाती नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे तातडीने करुन नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केली आहे.

आश्‍वासनांच्या पूर्ततेकरिता करणार प्रामाणिक प्रयत्न:- एस.के.सर

चकलांबा दि.12(प्रतिनिधी)ः- ग्राम पंचायतच्या थेट सरपंच पदाच्या निवडणूकांमध्ये निसटता पराभव झालेल्या एस.के.सरांनी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये दिलेल्या अभिवचनानुसार चकलांबा गावामध्ये वर्षानुवर्षे असलेल्या समस्या कायद्याच्या कक्षेत सोडविण्याकरिता पाऊल उचलले आहे. 

भगवानबाबा प्रतिष्ठाणच्या अखंड हरिनाम सप्ताहाची विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता

बीड(प्रतिनिधी): येथील श्रीसंत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाची सांगता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 5 फेबु्रवारी रोजी झाली. ह.भ.प.रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार, निराधारांच्या प्रश्‍नावर आंदोलन करणार-दिलीप भोसले, बरकत पठाण

बीड (प्रतिनिधी) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करावी तसेच त्यांना बेबाकी प्रमाणपत्र वितरीत करावे, सुशिक्षीत बेरोजगारांसाठी पोलिस भरती आणि तलाठी भरतीच्या जागा वाढवून द्यावा, विविध महामंडळासहीत मुद्रा योजनेच्या कर्जाचे वाटप राष्ट्रीयकृत बँकेमार्फत तात्काळ करावे यासह विविध मागण्यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष बरकत पठाण यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

विविध मागण्यासंदर्भात बसपा, डिपीआय, लोजपाचे जिल्हाकचेरीसमोर आंदोलन

बीड (प्रतिनिधी) बहुजन समाज पार्टीच्यावतीने निवडणूकांमध्ये ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा यासह विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. डिपीआयच्यावतीने केज तालुक्यातील नांदूरघाट येथे एका दलित युवकाला बेदम मारहाण केली होती. यात आरोपीविरूध्द ऍट्रासिटी गुन्हा दाखल झालेला असतांनाही आरोपीला अटक करण्यात आली नाही.

दरोडेखोरांचे साम्राज्य !धोंडराईतील शेतवस्त्यांवर दरोडेखोरांची लुटमार महिलेसह तिघे गंभीर जखमी; हजारोंची लुट

गेवराई (प्रतिनिधी) अज्ञात दरोडेखोरांनी धोंडराई परिसरातील शेतवस्त्यांवर धुमाकूळ घालत एकाच रात्री तीन ठिकाणी चोर्‍या केल्या. यावेळी शेतवस्त्यांवरील कुटूंबांना दंडूके, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली असून त्यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर गेवराई पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर अपघात;एकजण जागीच ठार 

अजय बोराडे - औरंगाबाद
———————————————————————————
औरंगाबाद-जळगाव महामार्गावर दि.१०(शनिवार)रोजी मोटारसायकल व खाजगी  बसचा अपघात झाल्याने लिहाखेडी ता.सिल्लोड येथिल तरुण गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला. लिहाखेडी येथिल श्रीराम विठ्ठल फरकाडे(२५) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

बाबरी मशिदीबाबत समझोता नाहीच: ओवेसी

हैदराबाद व्रतसेवा : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आ

बीड जिल्ह्यात गारपिट; पिकांना तडाखा

बीड (प्रतिनिधी) दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आज पहाटे जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली. बीड, माजलगाव, गेवराई, शिरूर तालुक्यासह अन्य ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे पिकांना मोठा तडाखा बसला आहे. माजलगाव तालुक्यातील पपईच्या बागा पुर्णपणे उध्वस्त झाल्या असून रब्बीच्या अन्य पिकांनाही मोठा फटका बसला आहे.

Pages