बीड शहर

पाच तालुक्यांमध्ये पाणीदार चळवळ बीडच्या जिल्हाधिकार्‍यांसमवेत आमिर खानची बैठक; पाणी फाऊंडेशन अंतर्गत कामांची चर्चा

बीड (प्रतिनिधी) अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वाटप कप स्पर्धेत जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश झालेला आहे. त्याअनुषंगाने दि.१९ रोजी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी आमिर खान यांच्याशी चर्चा केली. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत होत असलेल्या कामांप्रमाणेच स्पर्धेत सहभागी गावातही जास्तीत जास्त कामे व्हावीत अशी अपेक्षा आमिर खान यांनी व्यक्त केली आहे.

बीड जिल्ह्यातील ३९ हजार विद्यार्थ्यांची उद्यापासून परिक्षा मिशन बारावी; जिल्हाभर भरारी पथकांची संख्या वाढवली

बीड, (प्रतिनिधी): उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा अर्थात बारावीच्या परिक्षांना उद्या दि.२१ ङ्गेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. जिल्हाभरातील ९० केंद्रावर ३८ हजार ८३८ विद्यार्थी परिक्षा देणार असून कॉपीमुक्त वातावरणात परिक्षा व्हाव्यात यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली असून अतिसंवेदनशिल केंद्रावर बैठे पथक राहणार आहे. 

शिवसेनेकडून जिल्ह्यात २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान शिवसंपर्क मोहीम

बीड-शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसंपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका शिवसेना पक्षनिरीक्षकांच्या उपस्थितीत होणार आहेत. उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखांनी आपल्या तालुक्यातील सर्व संघटनात्मक माहिती या बैठकांना पक्षनिरीक्षकांकडे सादर करावयाची असून सदरील बैठकांना शिवसेना पक्षपदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले आहे.

शेख रिजवान यांचे निधन

बीड (प्रतिनीधी) शहरातील झमझम काॅलनी येथील रहिवाशी शेख रिजवान यांचा राञी दहा वाजता निधन झाले

सिटी बिल्डींग मटेरियल बार्शी रोड यांचे मालक शेख नासेर यांचे मोठे बंधु व पञकार शेख तालीब यांचे चुलत बंधु शेख रिजवान वय ४८ वर्ष रा झमझम काॅलनी यांचे अाज राञी दहाच्या सुमारास अल्पशा अाजाराने निधन झाले त्यांची जनाजा नमाज, दफनविधी सकाळी दहा वाजता तकिया मस्जीद कब्रस्थान येथे होनार अाहे त्यांच्या पच्छात अाई, तीन भाऊ असा परिवार अाहे शेख कुंटुबियांच्या दुखात सिटीझन परिवार सहभागी अाहे

दोन भावंडांचा विहिरीत पडून दुर्देवी अंत भवानवाडी येथील घटना; परिसरात शोककळा

बीड (प्रतिनिधी) भवानवाडी येथील गावातील विहिरीजवळ दोन भावंड खेळत होते. दोघेही खेळण्यात मग्न असतांना एक भाऊ पाय घसरून विहिरीत पडला त्याला वाचवण्यासाठी दुसर्‍या भावाने कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता विहिरीमध्ये उडी घेतली. या घटनेत दोन्ही भावांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विवाहीत महिलेला तिच्या नवर्‍यानेच पेटवून दिले कोळगाव येथील प्रकार; महिलेची मृत्यूशी झुंज

गेवराई (प्रतिनिधी) येथील कोळगावमध्ये काल दुपारी नवरा-बायकोच्या भांडणामध्ये नवर्‍याने अक्षरश: बायकोच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत महिला १०० टक्के भाजली गेली असून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. महिलेच्या फिर्यादीवरून तिच्या नवर्‍याविरूध्द तक्रार नोंदवण्यात आल्याचे कळते.

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केद्रींत करून भविष्याची वाटचाल करावी-डॉ.योगेश क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी) शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी गुणात्मक दृष्टीकोण ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.

स्वच्छ, सुंदर बीड पहायचंय, तर चला पत्रकार भवनाकडे!

बीड (प्रतिनिधी) स्वच्छ आणि सुंदर बीडचा संकल्प, दावा नेहमीच केला जातो. प्रत्यक्षात मात्र ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग आणि तुंबलेल्या नाल्यांचे चित्र पहायला मिळते. याचीच प्रचिती नवी भाजीमंडईतील पत्रकार भवनाजवळ येवु लागले आहे. भवनाच्या प्रवेशद्वारावरच मोठी नाली तुंबली असल्याने तेथून जाणेही अवघड होत आहे. शहरभर स्वच्छतेचा डांगोरा पिटणार्‍या पालिका प्रशासनाला पत्रकार भवनाजवळची नाली दिसत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कर्मचारी संपावर ग्रामविकास मंत्र्यांचा जिल्हा असूनही चार दिवसांपासून दुर्लक्ष

बीड (प्रतिनिधी) प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्‍यांनी प्रलंबीत मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. जिल्ह्यातील २६ कर्मचारी त्यामध्ये सहभागी झाले असून चार दिवसांपासून संप सुरू असूनही प्रशासन दखल घेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामविकास मंत्र्याच्या जिल्ह्यातच कर्मचार्‍यांवर ही वेळ आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

तरूणास मारहाण करून लुटले; पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल

 
बीड (प्रतिनिधी) शहरातील शहेंशाहवली दर्गा तलावाजवळ एका १७ वर्षीय तरूणास चार ते पाच जणांनी मारहाण केली. मारहाणीनंतर तरूणाजवळील विस हजार रूपये रोख रक्कम घेवून हल्लेखोर फरार झाले. तरूणाच्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलिस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमध्ये युवकावर चाकु हल्ल

 
बीड (प्रतिनिधी) शहरातील माळी गल्ली भागातील एका युवकावर रात्री चौघांनी चाकुहल्ला केल्याची घटना मसरत नगर भागात घडली. सदरिल युवकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसापूर्वीच दोन विद्यार्थ्यांवर तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली होती.

बीडमध्ये २५ शेळ्यांची चोरी

बीड (प्रतिनिधी) शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील बाजुस असलेल्या घराजवळून अज्ञात चोरट्यांनी २५ शेळ्या चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मजुराच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शहरात आधीच चोर्‍यांचे सत्र वाढले आहे. त्यात आता चोरट्यांनी पशुधनही लक्ष केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

बीडमध्ये सराफ-सुवर्णकारांची निदर्शने

बीड (प्रतिनिधी) केज येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांची हत्या घडवून लुट केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी जिल्हा कचेरीसमोर सराफ-सुवर्णकार असोसिएशनच्यावतीने निदर्शने करण्यात आली. या प्रकरणाची पुर्ण चौकशी करून विशेष सरकारी वकिल म्हणून ऍड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि मयत व्यापार्‍याच्या कुटूंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली.

सरपंचाच्या मुलास मारहाण करून लूटले

बीड (प्रतिनिधी); आज दुपारी 4.30 वाजता शहीनशाह वली दरगाह तलावा जवळ  इस्लामपुरा बीड येथे सय्यद कामरान सय्यद रौफ वय 17 यास पाशा मिस्त्री  यांचा मुलगा  फरयान वो अन्य तीन ते चार जणांनी खोऱ्याच्या दांडकाने जीवे मारण्याच्या  उद्देशाने मारहाण केली. वो त्याच्या जवळील नगदी 20000 हजार रुपये घेऊन पोबारा  केला.जखमी मुलास शासकीय रुग्णालय वार्ड क्रमांक 5 मध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्यास डोक्याला सात टाके पडले आहेत जखमी मुलगा हा आष्टी जि.

शासकीय कामाच्या उद्घाटनांची जाहीरात असेल तरच प्रसिध्दी

मालक-संपादकांच्या बीडमधील चिंतन बैठकीत एकमुखाने निर्णय  ◼प्रशासकीय मान्यतेशिवाय निधी मंजूर झाल्याच्या बातम्या पेरणार्‍या हौसी नेत्यांना आता बसणार दणका 

 

एमआयएमचे माजी शहराध्यक्ष  डॉ. इद्रीस हाश्मी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश  खा. अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत घातला गळ्यात गमचा 

बीड ( प्रतिनिधी ) एम आयएमचे माजी शहराध्यक्ष तथा त्याच पक्षाच्या स्वतंत्र गटाच्या कोट्यातून पालिकेचे स्वीकृत सदस्यपद मिळवलेले डॉ इद्रीस हाश्मी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसचा गमचा गळ्यात घातला.

मेगा पोलिस भरतीसाठी युक्रांदचे मुख्यमंत्र्यांना निवेदन लवकरच पूर्ण जागा भरु -मुख्यमंत्री

बीड (प्रतिनिधी) राज्यात हजारो युवक युवती पोलिस भरती पूर्व तयारी करीत आहेत. गेल्या चार वर्षांपासून पोलिस दलात मेगा भरती केली नाही. यामुळे पोलिस  भरती करावी अशी मागणी युक्रांदच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वार केली. राज्यात लवकरच पोलिसाच्या पूर्ण भरणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Pages