Add new comment

दोन भावंडांचा विहिरीत पडून दुर्देवी अंत भवानवाडी येथील घटना; परिसरात शोककळा

बीड (प्रतिनिधी) भवानवाडी येथील गावातील विहिरीजवळ दोन भावंड खेळत होते. दोघेही खेळण्यात मग्न असतांना एक भाऊ पाय घसरून विहिरीत पडला त्याला वाचवण्यासाठी दुसर्‍या भावाने कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता विहिरीमध्ये उडी घेतली. या घटनेत दोन्ही भावांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भवानवाडी येथील प्रमोद लक्ष्मण मुंडे (१०), विक्रम लक्ष्मण मुंडे (५) हे दोघे भाऊ गावातील विहिरीजवळ खेळत होते. खेळतांना विक्रम मुंडे हा पाय घसरून विहिरीत पडला. हे पाहताच प्रमोद मुंडे याने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपल्या भावाला वाचवण्यासाठी थेट विहिरीमध्ये उडी घेतली आणि भावाचा जिव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र काळाने या दोघाही भावांवर झडप घातली. या घटनेत दोन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती परिसरातील नागरीकांना कळाली असता परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.