जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांना संदीप क्षीरसागरांनी दिले परातभर पैसे बार्शीनाका पुल येथील पाईपलाईन कामाच्या तांत्रिक मंजुरीला टाळाटाळ
गांधीगिरी आंदोलनाने अधिकार्यांची उडाली झोप
बीड (प्रतिनिधी) बार्शीनाका पुलाचा प्रश्न बीडकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या पुलाचे काम पाहिजे त्या गतीने होत नाही. त्यात पुलापासून गेलेली नगर पालिकेची पाईपलाईन जी तातडीने इतरत्र हलविणे आवश्यक आहे. यासाठी पालिकेने प्रस्ताव बनवून जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाकडे पाठविला. परंतु तेथील अभियंता यांनी *वारंवार त्यात त्रुटी काढून तब्बल चार वेळा नगर पालिकेचा पाईप शिफ्टिंगचा प्रस्ताव फेटाळला.* केवळ टक्केवारीसाठी संबंधित अधिकार्यांनी हा खेळ चालविल्याने जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांना राष्ट्रवादीचे युवानेते जिल्हा परिषद सदस्य *संदीप क्षीरसागर* यांनी गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करत परतभर पैसे दिले. बीड येथील जीवनप्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांना आंदोलनाची खबर लागताच पळ काढल्याने तेथे उपस्थित कर्मचार्यांना परातभर पैसे देण्यात आले.
बार्शीनाका पुलाजवळून पालिकेची पाईपलाईन गेली आहे. ही पाईपलाईन इतरत्र हलविल्याशिवाय पुलाच्या खुटी भरता येत नाहीत. वेळेत पाइपलाईन हलविली नाही तर मोठा कालावधी या पुलाच्या कामाला लागू शकतो. पाईपलाईन हलविण्याचा प्रस्ताव बीड पालिकेने मुख्याधिकार्यांमार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे दाखल केला. *परंतु चार वेळेस सदरील प्रस्ताव फेटाळण्यात आला.* केवळ चिरीमिरीच्या हव्यासापोटी सदरील प्रस्तावात सुधारणा करुन तांत्रिक मान्यतेसाठी सादर करावा अशा जीवन प्राधिकरणच्या भूमिकेमुळे पालिका प्रशासन पूर्णपणे वैतागली आहे. यावर राष्ट्रवादीचे युवानेते तथा जिल्हा परिषद सदस्य *संदीप क्षीरसागर* यांनी नगरसेवकांना सोबत घेत 17 फेब्रुवारी रोजी जीवन प्राधिकरणच्या बीड कार्यालयात जाऊन गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले. तेथील कार्यकारी अभियंता भांबरे यांना *परातभर पैसे* सदरील कामाच्या मंजूरीसाठी दिले. कार्यकारी अभियंता कार्यालयात नसल्याने सदरील परातभर पैसे कार्यालयातील एका अधिकार्याने स्वीकारले. *संदीप क्षीरसागर* यांनी बार्शीनाका पुलाजवळील पाईपलाईन हलविण्याच्या कामासाठी केलेल्या गांधीगिरी आंदोलनामुळे तेथील अधिकार्यांची चांगलीच झोप उडाली आहे. *यावेळी फारुक पटेल, गटनेते अमर नाईकवाडे, नगरसेवक रमेश चव्हाण, भाऊसाहेब डावकर, युवराज जगताप, सचिन शेळके,बाजीराव बोबोडे, बिभीषण लांडगे, बाळू गुंजाळ, रणजीत बनसोडे, केशव तांदळे* यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add new comment