बीड शहर

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करावा ; बीडमध्ये मराठा आरक्षण जनसुनावणी; राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी स्विकारली निवेदने

बीड, (प्रतिनिधी):- मराठा समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये सरसकट समावेश करावा अशी मागणी विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांकडे केली. सकाळी ११ वाजता बीड येथे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांपुढे झालेल्या जनसुनावणीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे असा एकमुखी सूर अनेकांनी व्यक्त केला.

५० रुपयांच्या आमिषाने पोलवर चढला, शॉक लागून जीव गमावला

बीड । प्रतिनिधी
—————————————
दिंद्रुड येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे
. दिंदृड येथे वीज जोडणीसाठी विद्यूत खांबावर चढलेल्या शेतकऱ्याचा अचानक विद्यूत प्रवाह सुरू झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. बळीराम माने असे शेतकऱ्याचे नाव आहे.

शहेंशाहवली दर्गाहच्या इनामी जमिनीचे सर्रासपणे हस्तांतरण बेकायदेशिर हस्तांतरण थांबवा-महंमद जियाओद्दीन

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील हजरत शहेंशाहवली दर्गाहच्या इनामी जमिनीचे सर्रासपणे हस्तांतरण करुन त्याची विक्री करण्याचे प्रकार सुरु आहेत. जमिनीच्या बाजूने चौपदरी रस्ता जात असल्याचा फायदा घेत तेथील इनामी जमिनीची विक्री केली जात  असुन सदरील जमिनीचे बेकायदेशिर हस्तांतरण थांबवा अशी मागणी दर्गाहच्या इनामदार महंमद जियाओद्दीन जहूरोद्दीन यांनी जिल्हा वक्फ अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे

बीड जिल्ह्यातील मुकादमांचे नाशिक येथे कारखान्याविरोधात उपोषण

बीड, (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि गेवराई येथील मुकादमांचे सन २०१५-१६ या वर्षाचे कमिशन, डिपॉझिट, ऊसतोडणी वाहतुक डिपॉझिट देण्यात यावे या मागणीसाठी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना, विठेवाडी ता.देवळा जि.नाशिक येथे मुकादमांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. बीड जिल्ह्यातील मुकादमांचा या आंदोलनात सहभाग आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उद्या 'दंगल' ! महिला दिनानिमित्त सीईओ येडगे यांचे आदेश

बीड ( प्रतिनिधी ) जागतीक महिला दिनानिमित्त उद्या दि. 8 मार्च रोजी दुपारी 12. 30 नंतर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना दंगल चित्रपट दाखविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. यासंदर्भात प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबत अंमलबजावणी करून त्याचा अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

मोबाईलचा आयएमईआय बदलणारे चौघे गजाआड

बीड, (प्रतिनिधी):- मोबाईल चोरून त्याचे आयएमईआय क्रमांक बदलणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.घनश्याम पाळवदे व त्यांच्या टिमला यश आले आहे. शिवाजीनगर हद्दीत एका घरावर छापा टाकून पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्यांच्याकडून २७ मोबाईल आणि अन्य साहित्य असा एकूण ३ लाख १ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एमआयएमचे उपोषण ठरले फार्स; वीस तारीख होऊनही मोमीनपुर्‍यातील एक दगडही हलला नाही!

बीड (प्रतिनिधी)- शहरातील मोमीनपुरा, अशोकनगर भागातील रस्ता रुंदीकरण प्रश्‍नी एमआयएमचे गटनेते, नगरसेवक यांनी पालिकेसमोर बेमुदत उपोषण केले होते. त्याच दिवशी रात्री उशिरा मुख्याधिकार्‍यांनी २० फेब्रुवारीपर्यंत काम सुरु करण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. २० तारीख होऊन पंधरा दिवस उलटले तरीही मोमीनपुर्‍यातील रस्त्यावरील साधा दगडही हलला नसल्याने एमआयएमचे उपोषण केवळ फार्स ठरल्याची चर्चा नागरिकांमध्ये होवू लागली आहे.

मोबदल्यासाठी आत्महत्येचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

वडवणी -प्रतिनिधी
----------------------------------
रेल्वे मार्गासाठी शासनाने संपादीत केलेल्या जमिनीचा योग्य मावेजा मिळावा यासाठी विष प्राषण करत आत्महत्या करण्याचा इशारा देणाऱ्या मनोहर लक्ष्मण पतंगे या शेतकऱ्याचा धुळवडीच्या दिवशी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मातीमोल भावात सोन्यासारखी जमिनीवर खोदकाम करून ताबा घेतल्याने मानसिक धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. मनोहर पतंगे यांच्या मृत्यूमुळे वडवणी शहर आणि परिसरातील बाहेगव्हाण मोरवड, हिवरगव्हाण आदी भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत.

गाडगेबाबांचा वसा हाती घेणाऱ्या योगीता गवळीचे काम कौतुकास्पद-सुभाष धस

आष्टी (प्रतिनिधी) : शिरूर येथे भाजपाच्या बुथप्रमुख प्रशिक्षण शिबीरामधे स्वच्छतादुत कु.योगिता आजीनाथ गवळीचा कमलरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा अल्पसंख्याकचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी सत्कार शुभेच्छा देवून म्हणाले की योगिताने शिक्षण चालुअसतांना स्वच्छतेसाठी काम करून संत गाडगेबाबांचा वसा हाती घेतला असून तिचे काम खूप कौतुकास्पद आहे असे सांगितले.

कुंडलीका नदीच्या पात्रात बुडुन चिमुकलीचा मृत्यू

वडवणी (प्रतिनिधी):-

वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील एका ७ वर्षीय बालिकेचा गावालगत असलेल्या कुंडलिका नदीतील पाण्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली असुन गेल्या तिन महिण्यातील गावातील ही दुसरी घटना असल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा नसता भाजपा आमदारांना गावोगाव फिरू देणार नाहीत

खांडेंच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या 'शिवसेना आपल्या दारी' अभियानात शेतकऱ्यांचा भाजपाला इशारा

बीड येथील डॉ. सानप यांच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या ; जितुंर येथे दवाखान्यातील खोलीतच ओढणीने घेतला गळफास

बीड (प्रतिनीधी) परभणी जिल्ह्यतील जिंतुर येथे खैर प्लॉट भागात राहणाऱ्या एका डॉक्टर महिलेने आपल्या दवाखान्यातील खोलीत पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. डॉ. मीरा सानप (३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

'ती' लग्नासाठी जयपूरहून बीडला आली; मात्र 'कोवळे' प्रेम पाहून आल्या पाऊली परतली

बीड : चार महिन्यांपुर्वीच फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असे समजल्यावर ‘ती’ बीडला आली. ‘त्याची’ भेट घेताच आपला प्रियकर अवघ्या १७ वर्षाचा असून आपण त्याप्रेक्षा ९ वर्षांनी मोठे आहोत, हे समजले. ही सर्व परिस्थिती अनुभवल्यानंतर मुलाच्या कुटूंबियांच्या मदतीनेच ती आल्या पाऊली परतली. हा प्रकार शुक्रवारी बालेपीर भागात घडला. मात्र प्रेमात वेडा झालेला मुलगा बेपत्ता असून याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

आघाडीचे नगरसेवक फारूख पटेल यांचे सदस्यत्व कायम

बीड, (प्रतिनिधी):- विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांना इम्तियाज बशीर तांबोळी यांनी आघाडीचे नगरसेवक फारूख पटेल यांच्याविरोधात अपात्रतेची तक्रार दाखल केली होती. यावर जिल्हाधिकारी यांनी कलम ४४/४ अन्वये निर्णय देत अपात्रतेची कारवाई केली होती. याविरोधात नगरविकास मंत्रालयाकडे नगरसेवक फारूख पटेल यांनी अपिल दाखल केले होते. त्याचा नगरविकास मंत्रालयाने निर्णय देत त्यांचे नगरसेवकपद कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे फारूख पटेल यांना दिलासा मिळाला आहे.

खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या प्रयत्नाने बीड मध्ये सुरू होणार पासपोर्ट कार्यालय- सलीम जहांगीर

बीड- पासपोर्ट कार्यालय बीड येथे सुरू करण्याची मागणी खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी केली होती. या साठी लगण्यार्‍या जागेची अडचण येत होती त्या संदर्भात खा.डॉ. प्रीतमताई यांनी प्रशासनाला सूचना देत लवकरात लवकर जागा निश्चित करून कार्यालय सुरू करण्यास सांगितल्या नंतर तात्काळ अधिकार्‍यांनी पाहणी करून राजुर वेस,मुख्य डाकघर (पोस्ट ऑफिस) येथे एक महिन्यात कार्यालय सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा विकास सनियंत्रण व समन्वय दिशा समितीचे सदस्य सलीम जहांगीर यांनी दिली.

Pages