बीड शहर

खोर्‍याचा दांडा डोक्यात घातला

बीड, (प्रतिनिधी)ः- शहरातील माळीवेस भागातील यादव यांचा मळा बारा दरी येथे  शिवीगाळ करत लाथा बुक्कयाने आणि खोर्‍याच्या दांड्याने मारहाण करीत जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

चौसाळा येथे ग्रामीण रूग्णालय व ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्यासाठी ना.पंकजाताई मुंढे यांनी घेतला पुढाकार-रमेश पोकळे 

चौसाळा (प्रतिनिधी) चौसाळा परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चौसाळा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे हि मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती.या महत्त्वपुर्ण मागणीची दखल ग्रामविकास मंञी तथा पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी घेतली असून लवकरच चौसाळा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मंजूर होईल असा विश्वास भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी व्यक्त केला आहे.

बीडमध्ये अनोख्या पद्धतीने होळी

बीड (प्रतिनिधी) होळी केवळ कौटुंबिक सण न ठेवता बीडमध्ये सर्व पक्ष आणि संघटनेतील सदस्यांनी एकत्र येऊन आज अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली. जातीयवादाच्या विचारांची होळी करून आम्ही सर्व एकत्र चा नारा देणारी ही अनोखी होळी येथील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स जवळ करण्यात आली. यावेळी भाजपचे जि.प.सभापती संतोष हांगे, जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जगदीश गुरखूदे, स्वप्नील गलधर, सलीम जहांगीर, ऍड.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात विधानसभेत घोषणाबाजी

मुंबई (प्रतिनिधी) विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैसे घेतल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दाखविले आहे. त्यामुळे कुणाच्यातरी हितासाठी असे प्रश्न उपस्थित केले जात असल्याचा आरोप सत्ताधार्‍यांकडून करण्यात आला आहे.  या वृत्तानंतर सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांचा तास सुरू होताच गोंधळ घातला. सभागृहात धनंजय मुंडे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.

यमपुरेंचा राजेशाही थाट; खोटा सर्व्हे करण्याचा घालत आहे घाट बीड स्वच्छ सर्व्हेक्षणाचा खोटा अहवाल शासनाला!

बीड (प्रतिनिधी) बीड शहरामध्ये विविध प्रभागामध्ये स्वच्छतेचा सर्व्हे करण्यासाठी प्रशासनाने काही व्यक्तींची नेमणुक केली आहे. पथकामध्ये फिरणारे यमपुरे नामक व्यक्ती आज शहरातील धानोरा रोड लगत असलेल्या भागामध्ये आले. बीड शहरातील स्वच्छतेचा सर्व्हे ते मोबाईल ऍपद्वारे करत होते. तुमच्या प्रभागामध्ये घंटा गाडी येते का? सार्वजनिक मुतार्‍या आहेत का? यासह विविध प्रश्‍नावली त्या मोबाईल ऍपमध्ये होती. व्यक्तीचे नाव तो किती वर्षापासून त्या प्रभागात राहतो.

मालमत्ता धारकांनी थकबाकी भरा नसता सिल ठोकणार-मुख्याधिकारी

बीड (प्रतिनिधी) शहरातील नगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता व गाळाधारकांनी आपल्याकडील नगरपालिकेचे थकबाकी तात्काळ भरण्यात यावी नसता मालमत्ता सिल करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे. शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडील वसुलीसाठी कडक मोहिम सुरू आहे. थकीत मालमत्ता धारकांच्या अनेक मालमत्ता सिल करण्यात आल्या आहेत. तरी शहरातील नागरीकांनी आपल्याकडील नगर परिषदेचे कर तीन दिवसाच्या आत भरावे नसता मालमत्ता सिल करून नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा मुख्याधिकारी बीड यांनी दिला आहे.

अपघातात विद्यार्थीनी ठार

बीड (प्रतिनिधी) येवलवाडीत ता.पाटोदा येथे बारावीची परिक्षा देण्यासाठी भावासोबत मोटारसायकलवर निघालेल्या एका विद्यार्थीनीचा रस्त्यातील खड्यामुळे अपघात झाल्यामुळे दु:खद निधन झाले आहे.

बीड बालेपीर येथील  शेख फारूक पटेल यांचे निधन

बीड ( प्रतिनिधी ) शहरातील बालेपीर भागातील अजमेर नगर येथील रहिवाशी शेख फारूक इब्राहिम पटेल यांचे शनिवारी ( दि.24 ) सायंकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते 48 वर्षांचे होते. त्यांचा दफनविधी आज रविवारी ( दि. 25 )सकाळी 9 वाजता होणार आहे. 

कृषी विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे बीड तालुक्यातील बोंड अळी प्रार्दुभावग्रस्त शेतकर्‍यांवर अन्याय

बीड :(प्रतिनिधी 24 फेबु्रवारी )  यंदा कापुस पिकावर बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने तालुक्यातील बहुतांशी शेतकर्‍यांचे कापूस पीक हातचे गेले आहे. बोंडअळीच्या प्रार्दुभावामुळे शेतकर्‍यांना प्रचंड अर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कापुस हे नगदी पीक असल्याने मराठवाडा व विदर्भ भागात कापसाचे पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी अचानक बोंडअळीच्या आगमनामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

तोेंडावर लघुशंका करणार्‍या दोन्ही गुट्टेंविरूध्द गुन्हा दाखल

बीड (प्रतिनिधी) पैशाच्या कारणावरून एका सालगड्यास जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्या तोंडावर लघुशंका करणार्‍या गुट्टे बंधुविरूध्द परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीतांवर गुन्हा दाखल करून न्याय द्यावा या मागणीसाठी सालगड्याने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते.

शेतकर्‍याची आत्महत्या; नऊ जणांविरूध्द गुन्हे दाखल

बीड (प्रतिनिधी) शेती नावाने करून देत नसल्यामुळे आठ ते नऊ जणांनी दिलेल्या जिवे मारण्याच्या धमक्यानंतर एका ३५ वर्षीय शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गोवर्धन हिवरा (ता.परळी) येथे घडली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून नऊ जणांविरूध्द सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीपच्या धडकेने विद्यार्थीनी ठार

 
बीड (प्रतिनिधी) भरधाव वेगातील बलेनो कारने जोराची धडक दिल्याने रस्ता ओलांडून शाळेत जात असलेल्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. हा अपघात दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी डोंगरकिन्ही-बीड रोडवरील भाटेवाडी येथे घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खा.दिलीप गांधी आणि मुलावर खंडणीचा गुन्हा दाखल होणा

अहमदनगर (वृत्तसेवा) अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिलीप गांधी यांच्यासह त्यांचा नगरसेवक मुलगा सुवेंद्र गांधीवर खंडणीचा गुन्हा दाखल करुन सीआयडी चौकशीचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिली आहेत. गांधी पिता-पुत्रांसह चौघांची सीआयडी चौकशी केली जाणार आहे.

सालगड्याने पैसे मागितले म्हणून मालकाने केली मारहाण

तोंडात लघुशंका करून जातीवाचक शिवीगाळ; जिल्हा कचेरीसमोर न्याय मागणीसाठी उपोषण

महाराष्ट्राचा इज्तेमा; स्वयंसेवकांची यंत्रणा सज्ज

बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्राचा इज्तेमा औरंगाबाद-लिंबेजळगाव येथे होत आहे. शनिवारपासून सुरू होणार्‍या तीन दिवसीय इज्तेमासाठी सर्वठिकाणच्या स्वयंसेवकांची यंत्रणा सज्ज झाली आहे. उद्या शुक्रवारपासूनच राज्यभरातील मुस्लिम बांधव औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत. इज्तेमास्थळी सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली असून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. बीड जिल्ह्यातूनही लाखोंच्या संख्येने समाजबांधव औरंगाबादला रवाना होणार आहे.

पोलिस अधिकार्‍यांच्या गणवेश भत्त्यात वाढ; २० हजार रूपये मिळणार

बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र संवर्गातील भारतीय पोलिस सेवेतील अधिकार्‍यांच्या गणवेश भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. प्रतिवर्ष १४ ऐवजी त्यांना आता २० हजार रूपयांचा भत्ता मिळणार असून त्यासंबंधीचे शासनादेश गृहविभागाने आज निर्गमित केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील पोलिस अधिकार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

बीड जिल्ह्यातील छावणी घोटाळा प्रकरणी कारवाईचे संकेत

न्यायालयाने फटकारताच  सातार्‍यात सव्वाशे जणांविरूध्द गुन्हे दाखल

उद्या बसपा प्रदेशाध्यक्ष बीडमध्ये

बीड (प्रतिनिधी) बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे बीड जिल्हा दौर्‍यावर येत असून बीडमध्ये उद्या त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. महाराष्ट्रात बहुजन समाज आणि आंबेडकर चळवळ कशी मजबुत होर्सल आणि सध्याच्या राजकारणामध्ये बहुजन समाज पार्टिची भुमिका काय असेल या विषयावर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Pages