Add new comment

भिमा कोरेगाव प्रकरणात दलित तरूणावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी भारीपचे आंदोलन

बीड, (प्रतिनिधी)ः- १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण राज्यातील दलित तरूणांवर आणि नागरीकांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल केलेले आहेत. यामुळे निरापरार्ध दलित तरूणांचे आयुष्य उदध्वस्त होेणार आहे प्रशासनाने याची दखल घेवुन भिमा कोरेगाव प्रकरणात निरापराध दलित तरूणांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी भारीप बहुजन महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भिमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली होती. यावेळी राज्य भरातील दलित तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले यामुळे दलित तरूणांचें आयुष्य उदध्वस्त होणार असल्याचे म्हणुन भारीपने आंदोलना दरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी आणि या प्रकरणात जबाबदार असलेल्या मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारीप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनात राहुल वडमारे, संतोष जोगदंड, अजय साबळे, शिवाजी थोरात, विवेक मस्के, सदानंद वाघमारे,प्रमोद डोंगरे, अजय सरवदे, धनराज, ज्ञानेश्‍वर कवठेकर यांच्यासह कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.