लाइव न्यूज़
धनंजय मुंडे यांच्या विरोधात विधानसभेत घोषणाबाजी
Beed Citizen | Updated: March 1, 2018 - 4:24pm
मुंबई (प्रतिनिधी) विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैसे घेतल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दाखविले आहे. त्यामुळे कुणाच्यातरी हितासाठी असे प्रश्न उपस्थित केले जात असल्याचा आरोप सत्ताधार्यांकडून करण्यात आला आहे. या वृत्तानंतर सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांचा तास सुरू होताच गोंधळ घातला. सभागृहात धनंजय मुंडे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. या खळबळजनक आरोपावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.
Add new comment