सरपंच पदाचा राजीनामा न दिल्याने दोन गटात मारहाण; ४४ जणांविरोधात गुन्हे दाखल,चार जण अटकेत

जामखेड, (प्रतिनिधी):- सरपंच पदाचा राजीनामा न दिल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील मोहरी गावात उसळलेल्या राजकीय दंगलीत ४४ जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्नासह दंगलीचे गुन्हे व आर्म ऍक्ट नुसार परस्परविरोधी गून्हे दाखल करण्यात आले आहेत. या राजकीय दंगलीमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, मोहरीचे सरपंच यूवराज बाबासाहेब हळनोर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि २ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजे दरम्यान मोहरी गावाच्या शिवारात मोहरीचे सरपंच यूवराज बाबासाहेब हळनोर यांना सरपंच पदाचा राजीनामा का दिला नाही या कारणावरून रामदास शिवदास गोपाळघरे यांनी लोखंडी टॉंमीने मारहाण करून गंभीर जखमी केले व जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर आरोंपीनी सरपंचाच्या इतर सहकार्यांना काठीने, दगडाने मारहाण करून जखमी केले.यावेळी झालेल्या मारहाणीत यूवराज हळनोर, बाबासाहेब काशिनाथ हळनोर, संजय सूखदेव श्रीरामे, पार्वती सूखदेव श्रीरामे, राधा यूवराज हळनोर, राजेंद्र अभिमान गलांडे, बंडू श्रीपती बाबर हे जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी त्रिंबक बाबासाहेब हळनोर, नंदु दादाराव गोपाळघरे, नवनाथ दादाराव गोपाळघरे, नाना बळीराम गोपालघरे, गोकुळ गोपाळघरे, रामदास शिवदास गोपाळघरे, शिवदास एकनाथ गोपाळघरे, रोहीत नवनाथ गोपाळघरे, गोरख गोपालघरे, भास्कर विश्वनाथ गोपाळघरे, राहूल गोरख गोपाळघरे, पप्पु गोरख गोपालघरे, बाळू भिमा ठोंबरे, बंडू भिमा ठोंबरे, भिमा ठोंबरे, गुड्डू भास्कर गोपालघरे ( सर्व रा मोहरी ता जामखेड) तसेच भाऊसाहेब नारायण जायभाय, संभाजी जायभाय, कांतीलाल जायभाय यांचा मुलगा, पंडीत जायभाय (सर्व राहणार जायभायवाडी ता जामखेड) या वीस आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच शिवदास एकनाथ गोपालघरे, बंडू भिमा ठोंबरे, भिमा ठोंबरे, रामदास शिवदास गोपालघरे या चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे
दरम्यान याच प्रकरणातील विरोधी गटाने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात फिर्यादी त्रिंबक नंदाराम गोपाळघरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी घरासमोर उभा राहुन बोलत आसतांना मच्छिंद्र नामदेव श्रीरामे याने तू सरपंचांना गावाच्या कामात विरोध का करतो असे म्हणत ठार मारण्याच्या उद्देशाने डाव्या डोक्यावर वार करून जखमी केले इतर लोकांनी लाकडी दांडक्याने दगडाने मला व सोडवायला आलेल्या मामाला व माझ्या सहकार्याना मारहाण करून जबर जखमी केले त्रिंबक गोपाळघरेंच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र नामदेव श्रीरामे यूवराज बाबासाहेब हळनोर लखन सूखदेव श्रीरामे भीवा श्रीपती बाबर संजय सूखदेव श्रीरामे सूखदेव नामदेव श्रीरामे अक्षय आशोक श्रीरामे बाजीराव शीवाजी बाबर बबन तात्याराव हळनोर मनोज बबन हळनोर रविंद्र शिवाजी बाबर अशोक शिवाजी बाबर धनंजय किसन श्रीरामे भागवत धनंजय श्रीरामे सागर बाळू चव्हाण धिरज सूधाकर काळे सूधाकर माधव काळे बलभीम अन्ना कांबळे ऊमेश बलभीम कांबळे बाबासाहेब काशिनाथ हळनोर आशोक तात्याराम श्रीरामे हनूमंत दशरथ हजारे चिंतामणी बाबा येळे सर्व रा मोहरी राजेंद अभिमन्यू गलांडे रा काळेवाडी ता करमाळा यांच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न आर्मऍक्ट नुसार गून्हे दाखल करण्यात आले आहेत. पूढील तपास जामखेड पोलिस करत आहेत उसळलेल्या राजकीय दंगलींमुळे जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. सध्या मोहरी गावात तणावपूर्ण शांतता आहे. सरपंचपदावरून उसळलेली राजकीय दंगल आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी आहे. राजकीय दंगलीचे लोण शमवण्यासाठी पोलीसांनी राजकीय दबाव झुगारून आरोपींना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.