Add new comment

टिप्परची लोखंडी पोलला धडक; एक गंभीर

पाटोदा (प्रतिनिधी)- पाटोदा येथे एका टिप्पर चालकाने निष्काळजी पणाने गाडी चालवत एका लोखंडी पोलला धडक दिल्याने पोल वरील विद्युत तार तुटुन अंगावर पडल्याने एक व्यक्ती गंभीर भाजल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी टिप्पर चालका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
आनपट वाडी येथील महादेव दिंगबर जायभाय वय-५५ हे पाटोदा येथील टोलनाक्या जवळ उभे असता पाठीमागुुन आलेल्या टिप्पर क्रं.एमएच २३ एवि ००६९ या टिप्पर चाल बाळासाहेब मोरे रा.लिंबागणेश यांनी निष्काळजी पणाने गाडी चालवत लोखंडी पोलला जोरदार धडक दिली. यामुळे पोल वरील विद्युत तारा जायभाय यांच्या अंगावर पडल्याने गंभीर भाजले या प्रकारणी पाटोदा येथे कलम. २६९, ३३७, भांदवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारणे पो.ह.जायभाय तपास करीत आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.