लाइव न्यूज़
Add new comment
जिल्हाभरात देशी-विदेशी दारू जप्त
Beed Citizen | Updated: March 3, 2018 - 3:18pm
बीड, (प्रतिनिधी)ः- धुलीवंदनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाभरात अवैधपणे देशी विदेशी दारूंची विक्री करणार्या पोलिसांनी धाडसत्र टाकत हजारो रूपयांची दारूसहीत मुद्देमाल जप्त केला आहे.
बीड ग्रामीण, शिरूर, अंबोरा, माजलगाव, सिरसाळा, तलवाडा, गेवराई, धारूर, बर्दापुर, वडवणी, केज, अंबाजोगाई, बीड शिवाजी नगर हद्दीत अवैध पणे दारूची विक्री करणार्यावर पोलिसांनी थेट कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे. धुलीवंदनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाभरात अवैधपणे दारूची वाहतुक करणार्या विरोधात पोलिसांनी व्यापक मोहिम राबवली. यामध्ये जिल्हाभरात विविध ठिकाणी देशी दारू तसेच विदेशी दारूची अवैध पणे विक्री करतांना मोठ्या प्रमाणात आढळून आले. अवैध दारू विक्री करणार्या विरोधात संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून हजारो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
