बीड शहर

कृषी विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे बीड तालुक्यातील बोंड अळी प्रार्दुभावग्रस्त शेतकर्‍यांवर अन्याय

बीड :(प्रतिनिधी 24 फेबु्रवारी )  यंदा कापुस पिकावर बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने तालुक्यातील बहुतांशी शेतकर्‍यांचे कापूस पीक हातचे गेले आहे. बोंडअळीच्या प्रार्दुभावामुळे शेतकर्‍यांना प्रचंड अर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कापुस हे नगदी पीक असल्याने मराठवाडा व विदर्भ भागात कापसाचे पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी अचानक बोंडअळीच्या आगमनामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

तोेंडावर लघुशंका करणार्‍या दोन्ही गुट्टेंविरूध्द गुन्हा दाखल

बीड (प्रतिनिधी) पैशाच्या कारणावरून एका सालगड्यास जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्या तोंडावर लघुशंका करणार्‍या गुट्टे बंधुविरूध्द परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीतांवर गुन्हा दाखल करून न्याय द्यावा या मागणीसाठी सालगड्याने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते.

शेतकर्‍याची आत्महत्या; नऊ जणांविरूध्द गुन्हे दाखल

बीड (प्रतिनिधी) शेती नावाने करून देत नसल्यामुळे आठ ते नऊ जणांनी दिलेल्या जिवे मारण्याच्या धमक्यानंतर एका ३५ वर्षीय शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गोवर्धन हिवरा (ता.परळी) येथे घडली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून नऊ जणांविरूध्द सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीपच्या धडकेने विद्यार्थीनी ठार

 
बीड (प्रतिनिधी) भरधाव वेगातील बलेनो कारने जोराची धडक दिल्याने रस्ता ओलांडून शाळेत जात असलेल्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. हा अपघात दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी डोंगरकिन्ही-बीड रोडवरील भाटेवाडी येथे घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खा.दिलीप गांधी आणि मुलावर खंडणीचा गुन्हा दाखल होणा

अहमदनगर (वृत्तसेवा) अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिलीप गांधी यांच्यासह त्यांचा नगरसेवक मुलगा सुवेंद्र गांधीवर खंडणीचा गुन्हा दाखल करुन सीआयडी चौकशीचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिली आहेत. गांधी पिता-पुत्रांसह चौघांची सीआयडी चौकशी केली जाणार आहे.

सालगड्याने पैसे मागितले म्हणून मालकाने केली मारहाण

तोंडात लघुशंका करून जातीवाचक शिवीगाळ; जिल्हा कचेरीसमोर न्याय मागणीसाठी उपोषण

महाराष्ट्राचा इज्तेमा; स्वयंसेवकांची यंत्रणा सज्ज

बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्राचा इज्तेमा औरंगाबाद-लिंबेजळगाव येथे होत आहे. शनिवारपासून सुरू होणार्‍या तीन दिवसीय इज्तेमासाठी सर्वठिकाणच्या स्वयंसेवकांची यंत्रणा सज्ज झाली आहे. उद्या शुक्रवारपासूनच राज्यभरातील मुस्लिम बांधव औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत. इज्तेमास्थळी सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली असून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. बीड जिल्ह्यातूनही लाखोंच्या संख्येने समाजबांधव औरंगाबादला रवाना होणार आहे.

पोलिस अधिकार्‍यांच्या गणवेश भत्त्यात वाढ; २० हजार रूपये मिळणार

बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र संवर्गातील भारतीय पोलिस सेवेतील अधिकार्‍यांच्या गणवेश भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. प्रतिवर्ष १४ ऐवजी त्यांना आता २० हजार रूपयांचा भत्ता मिळणार असून त्यासंबंधीचे शासनादेश गृहविभागाने आज निर्गमित केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील पोलिस अधिकार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

बीड जिल्ह्यातील छावणी घोटाळा प्रकरणी कारवाईचे संकेत

न्यायालयाने फटकारताच  सातार्‍यात सव्वाशे जणांविरूध्द गुन्हे दाखल

उद्या बसपा प्रदेशाध्यक्ष बीडमध्ये

बीड (प्रतिनिधी) बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे बीड जिल्हा दौर्‍यावर येत असून बीडमध्ये उद्या त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. महाराष्ट्रात बहुजन समाज आणि आंबेडकर चळवळ कशी मजबुत होर्सल आणि सध्याच्या राजकारणामध्ये बहुजन समाज पार्टिची भुमिका काय असेल या विषयावर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

महिलेची गळफास घेवून आत्महत्या

बीड (प्रतिनिधी) शहरातील कागदीवेस येथील एका ३७ वर्षीय महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

तडिपार प्रदिप जाधव पोलिसांच्या ताब्यात

बीड (प्रतिनिधी) विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला प्रदिप जाधव हा बीडमध्ये फिरत असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पीआय सय्यद सुलेमान यांना कळाली. यानंतर पीआय सय्यद सुलेमान यांनी सापळा रचून प्रदिप जाधवला ताब्यात घेतले असुन त्यावर बीड शहर पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.

बेरोजगारांच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे आंदोलन पकोडे तळून केला भाजप सरकारचा निषेध

बीड (प्रतिनिधी) भारतामध्ये सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सरकार मात्र नौकर्‍या देण्यात अपयशी ठरत आहे. बेरोजगारांना नौकर्‍या उपलब्ध करून द्याव्यात या प्रमुख मागणीसाठी आज राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस बीडच्यावतीने राष्ट्रवादी भवनासमोर पकोडे तळून भाजप सरकारचा निषेध नोंदवला आहे. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्ष रेखा फड यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.

परिक्षार्थ्यांची शाळा ; सीईओ येडगे यांनीच घेतला पहिला तास ! बारावीचा पहिला पेपर सुरळीत ; येडगे पॅटर्नचा दरारा

बीड ( प्रतिनिधी ) बारावीचा परीक्षा आज पासून सुरू झाल्या. पहिल्याच पेपरला धडाकेबाज एन्ट्री करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी ’ येडगे पॅटर्न ’ चा दरारा दाखवून दिला. सर्वच केंद्रांवर अपवाद वगळता परीक्षा शांततेत आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरू होती. आज खर्‍या अर्थाने परिक्षार्थ्यांची शाळाच झाली सीईओ येडगे यांनी पहिला तास घेत गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्राचा इज्तेमा; दुवाच्या दिवशीच बारावीचा पेपर! दि.२६ फेब्रुवारीचा पेपर पुढे ढकलण्याची मागणी

बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्राचा तीन दिवसीय इज्तेमा दि.२४ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद-लिंबेजळगाव येथे होत आहे. तिसर्‍या म्हणजे दुवाच्या दिवशीच बारावीचा पेपर आहे. त्यामुळे हजारे मुस्लिम विद्यार्थ्यांना दुवासाठी इज्तेमास्थळी उपस्थित राहता येणार नसल्याने त्यादिवशीचा पेपर पुढे ढकलून अन्य दिवशी घ्यावा अशी मागणी होवू लागली आहे.

बीएसएनएलचा महाधमाकेदार प्लॅन

बीड (प्रतिनिधी) प्राईस वारच्या सध्याच्या स्पर्धेच्या युगात बीएसएनएलने फक्त कॉलींग करणार्‍यांसाठी इतर खाजगी कंपन्यांच्या पुढे चार पाऊल टाकले आहेत. लोकप्रिय अशा महाधमाकेदार प्लॅन आजपासून प्रिपेड ग्राहकांसाठी घोषीत करण्यात आला आहे. रूपये ९९ च्या प्लॅनमध्ये अमर्याद बोलण्याची मुभा देण्यात आली आहे.

विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

बीड (प्रतिनिधी) एका १९ वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी रूद्रापुर (ता.बीड) येथे घडली. सदरिल विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मयत विवाहितेचे आई-वडिल ऊसतोड मजूर असून स्थलांतरी झालेले आहेत. ते आल्यानंतरच या प्रकरणातील पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

वर्‍हाडाच्या टेम्पोची मोटारसायकलला धडक; तिघे गंभीर जखमी

बीड (प्रतिनिधी) वर्‍हाड घेऊन जाणार्‍या टेम्मोने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील खालापूरीजवळ मंगळवारी दुपारी घडली. अपघातानंतरही जखमी युवकांना तिथेच सोडून पळून जाणारा टेम्पो सात किलोमिटर पाठलाग करून ग्रामस्थांनी पकडला.

Pages