लाइव न्यूज़
Add new comment
उद्या बसपा प्रदेशाध्यक्ष बीडमध्ये

बीड (प्रतिनिधी) बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे बीड जिल्हा दौर्यावर येत असून बीडमध्ये उद्या त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. महाराष्ट्रात बहुजन समाज आणि आंबेडकर चळवळ कशी मजबुत होर्सल आणि सध्याच्या राजकारणामध्ये बहुजन समाज पार्टिची भुमिका काय असेल या विषयावर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
बहुजन समाज पार्टिने उत्तर प्रदेशात आपली चांगली कामगिरी केली होती. एक हाती सत्ता आणून मायावती यांनी देशातील दलित समाजासह बहुजन समाजाचे नेतृत्व केले होते. बसपाची संघटन बांधणी सध्या देशभर सुरू असून महाराष्ट्रातही बसपा आपली पायामुळे रोवत आहे. उद्या दि.२३ ङ्गेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे तसेच महाराष्ट्राचे प्रभारी नातु खंदारे यांची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये ते बसपाच्या आगामी ध्येय धोरणाविषयी बोलणार आहेत
