Add new comment

रोटरी कलाविष्कार च्या जिल्हास्तरीय स्पर्धेचे अाज हाेणार उद‌्घाटन

बीड

राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रल अाणि नगराध्यक्ष डाॅ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या संयुक्त विद्यमाने राेटरी कलािवष्कार २०१८ स्पर्धेचे अाज रविवारी सकाळी नऊ वाजता उद‌्घाटन हाेणार अाहे. यात १४५ समुह नृत्य असून दीड हजाराहुन अधिक विद्यार्थी कला प्रकार सादर करणार अाहेत.

शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रविवारी सकाळी नऊ वाजता या स्पर्धेचे उद‌्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सवीता गाेल्हार अाणि नगर परिषदेचे नगाध्यक्ष डाॅ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते हाेणार अाहे. याच दरम्यान लाेकप्रश्न चे संपादक दिलीप खिस्ती यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान ज्येष्ठ पत्रकािरतेचा - २०१८ या पुरस्काराचे वितरण केले जाणार अाहे. या स्पर्धा सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार अाहेत.

स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण रविवारी सायंकाळी साडेसात वाजता हाेणार अाहे. बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमाेल येडगे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा प्राचार्य डाॅ. दिपाताई क्षीरसागर या असणार अाहेत. या कलाविष्कार साेहळ्यासाठी पालकांनी माेठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अावाहन  सेंट्रलचे अध्यक्ष गणेश वाघ, सचिव सुकेश राव,  संस्थापक अध्यक्ष संदेश लाेळगे,ज्ञानेश्वर तांबे, अजय घाेडके यांच्यासह सर्व राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रलच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

 
 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.