Add new comment

बीएसएनएलचा महाधमाकेदार प्लॅन

बीड (प्रतिनिधी) प्राईस वारच्या सध्याच्या स्पर्धेच्या युगात बीएसएनएलने फक्त कॉलींग करणार्‍यांसाठी इतर खाजगी कंपन्यांच्या पुढे चार पाऊल टाकले आहेत. लोकप्रिय अशा महाधमाकेदार प्लॅन आजपासून प्रिपेड ग्राहकांसाठी घोषीत करण्यात आला आहे. रूपये ९९ च्या प्लॅनमध्ये अमर्याद बोलण्याची मुभा देण्यात आली आहे.
बीएसएनएलचा प्लॅन हा ज्यांचा डाटा वापर कमी परंतू कॉलींग जास्त प्रमाणात आहे. अशा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ९९ रू.मध्ये अनलिमिटेड कॉलींग कुठल्याही नेटवर्कला २६ दिवसांची वैधता देण्यात आली आहे तर ३१९ रू.च्या अनलिमिटेड कॉलींग कुठल्याही नेटवर्कसाठी ९० दिवसांची वैधता राहील. इंटरनेट डाटा वापरणार्‍यांसाठी मिनी पॅक नावाने फक्त ७ रूपयांमध्ये १जीबी डाटा व १६ रू.मध्ये २ जीबी डाटा १ दिवसाच्या वैधतेसाठी दिला जाणार आहे. सदरिल नवीन व्हाईस प्लॅन व मिनी पॅकचे रिचार्ज करून अमर्याद बोलण्याचा आनंद ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन महाप्रबंधक टी.डी.मुंढे, मार्केटींग विभागातील श्री.देशपांडे व विलास सुपेकर यांनी बीएसएनएलच्यावतीने केले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.