विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

बीड (प्रतिनिधी) एका १९ वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी रूद्रापुर (ता.बीड) येथे घडली. सदरिल विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मयत विवाहितेचे आई-वडिल ऊसतोड मजूर असून स्थलांतरी झालेले आहेत. ते आल्यानंतरच या प्रकरणातील पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
बीड तालुक्यातील रूद्रापुर येथील काजल विलास आघाव (१९) या विवाहितेने घरातील पत्र्याच्या आडूला गळफास लावून आत्महत्या केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणला होता. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी सदरिल विवाहितेने सासरच्या छळास कंटाळूनच आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.