बेरोजगारांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे आंदोलन पकोडे तळून केला भाजप सरकारचा निषेध
बीड (प्रतिनिधी) भारतामध्ये सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सरकार मात्र नौकर्या देण्यात अपयशी ठरत आहे. बेरोजगारांना नौकर्या उपलब्ध करून द्याव्यात या प्रमुख मागणीसाठी आज राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस बीडच्यावतीने राष्ट्रवादी भवनासमोर पकोडे तळून भाजप सरकारचा निषेध नोंदवला आहे. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्ष रेखा फड यांच्यासह महिलांची उपस्थिती होती. देशभरात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सरकार मात्र बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले आहे. अशातच बेरोजगारांनी नेमके करायचे काय? हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. बीड शहरामध्ये बेरोजगारांची परिषद देखील झाली आहे. मात्र याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. आज बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने सरकारचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी भवनासमोर पकोडे तळून सरकारच्या ध्येय धोरणाचा निषेध केला आहे. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्षा रेखा फड, कविता डोंगरे, जयश्री रणसिंग, नंदा सारूक, मनिषा घुगे, शारदा उजगरे, स्वाती अलझेंडे, सुनिता नवले, सिमा उघडे, प्रेमलता सोनवणे, इंदुबाई जावळे, सुशिला जावळे, पार्वती खेडकर, संदिप बिक्कड, अभय तिडके, गणेश सोनवणे आदिंची उपस्थिती होती.
Add new comment