लाइव न्यूज़
Add new comment
तडिपार प्रदिप जाधव पोलिसांच्या ताब्यात

बीड (प्रतिनिधी) विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला प्रदिप जाधव हा बीडमध्ये फिरत असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पीआय सय्यद सुलेमान यांना कळाली. यानंतर पीआय सय्यद सुलेमान यांनी सापळा रचून प्रदिप जाधवला ताब्यात घेतले असुन त्यावर बीड शहर पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.
बीड शहरामध्ये तेरवी लाईन धांडे गल्ली येथे तडीपार असलेला प्रदिप दशरथ जाधव हा पोलिसांना हुलकावणी देत शहरामध्ये फिरत असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पीआय सय्यद सुलेमान आणि त्यांच्या टीमला कळाली. यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे. प्रदिप जाधव याच्या विरूध्द बीड शहर पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली असुन या कारवाईत शहर पोलिस ठाण्याचे पीआय सय्यद सुलेमान, सय्यद अश्फाक, सारणीकर, पठाण, यांनी सहभाग घेतला.
