लाइव न्यूज़
Add new comment
महिलेची गळफास घेवून आत्महत्या
Beed Citizen | Updated: February 22, 2018 - 2:57pm
बीड (प्रतिनिधी) शहरातील कागदीवेस येथील एका ३७ वर्षीय महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
कागदीवेस येथील रहिवासी शेख साहेरा बेगम इनायत उल्ला (३७) यांनी काल रात्री त्यांच्या राहत्या घरी आडुला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कळाली असता त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. सदरील महिलेचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला असून आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली हे मात्र कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
