लाइव न्यूज़
शेतकर्याची आत्महत्या; नऊ जणांविरूध्द गुन्हे दाखल
Beed Citizen | Updated: February 24, 2018 - 3:02pm
बीड (प्रतिनिधी) शेती नावाने करून देत नसल्यामुळे आठ ते नऊ जणांनी दिलेल्या जिवे मारण्याच्या धमक्यानंतर एका ३५ वर्षीय शेतकर्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गोवर्धन हिवरा (ता.परळी) येथे घडली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून नऊ जणांविरूध्द सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिरसाळा पोलिस ठाण्यात उषा दिलीप राठोड (३४) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती दिलीप पांडूरंग राठोड यांच्या हिस्स्याची शेती नावे करून देत नसल्याने आठ ते नऊ जणांनी दि.१५ फेब्रुवारी रोजी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यामुळे पती दिलीप राठोड यांनी दि.२० फेब्रुवारी रोजी खारितांडा तहत गोवर्धन हिवरा शिवारातील चिकनी नामक शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येस पांडूरंग राठोड, लाडकाबाई पांडूरंग राठोड, कुंडलिक पांडूरंग राठोड, अरूण पांडूरंग राठोड, जनाबाई अरूण राठोड, यशोदा कुंडलिक राठोड, राहुल कुंडलिक राठोड, सचिन कुंडलिक राठोड, रोहित अरूण राठोड (सर्व रा.खारी तांडा तहत गोवर्धन हिवरा ता.परळी) हे कारणीभूत असल्याचे नमुद केले आहे. त्यावरून नऊ जणांविरूध्द सिरसाळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Add new comment