Add new comment

तोेंडावर लघुशंका करणार्‍या दोन्ही गुट्टेंविरूध्द गुन्हा दाखल

बीड (प्रतिनिधी) पैशाच्या कारणावरून एका सालगड्यास जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्या तोंडावर लघुशंका करणार्‍या गुट्टे बंधुविरूध्द परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीतांवर गुन्हा दाखल करून न्याय द्यावा या मागणीसाठी सालगड्याने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते.
परळी तालुक्यातील दैठणा घाट येथील खंडू रामकिसन उदारे (२७) या सालगड्यास दि.९ व ११ फेब्रुवारी रोजी दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून शेतात ओढून नेले. त्याठिकाणी त्याच्या तोंडावर लघुशंका करून त्यास मारहाण केली. याप्रकरणी तक्रार देवूनही पोलिस दखल घेत नसल्याने खंडू उदारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खंडू रामकिसन उदारे यांच्या फिर्यादीवरून प्रल्हाद श्रीराम गुट्टे, व हनुमंत श्रीराम गुट्टे या दोघांविरूध्द परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात ऍट्रासिटी ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल आनंद हे करीत आहेत.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.