Add new comment

बीड मध्ये वकीलाच्या घरी दरोडा;मारहाण करून ५० हजार लुटले.

बीड (प्रतिनिधी) शहरातील धानोरा रोड लगत असलेल्या संत नामदेव नगरमध्ये काल रात्री अज्ञात तीन चोरट्यांनी एका वकिलाच्या घराचा दरवाजा उघडा पाहुन शिताफीने घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी वकिलाला मारहाण करत घरातील सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम पळविण्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांविरूध्द शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब लखाळ यांनी भेट देवून पंचनामा केला आहे.
संत नामदेव नगर भागातील रहिवासी ऍड.अरविंद सुधाकर पाटील हे काल रात्री घरामध्ये टीव्ही पाहत होते. टीव्ही पाहतांना त्यांना अचानक झोप लागली. यामुळे घराचे मुख्य द्वार उघडे राहिले. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ऍड.पाटील यांच्या घरामध्ये प्रवेश करून ऍड.पाटील यांना बेदम मारहाण केली. यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेले १२ ग्रॅम सोन्यासह दहा हजार रूपये रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरिल प्रकार शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असुन याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.