बीड शहर

शिवसेनेच्या आ. निलमताई गोऱ्हे यांनी उचलली पञकार भास्कर चोपडेंच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी

?बीड, (प्रतिनिधी):- जेष्ठ पत्रकार भास्कर चोपडे  गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत 

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बीड, (प्रतिनिधी):- पाली येथील बिंदुसरा धरणाजवळ असलेल्या झाडीमध्ये एका ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान मयताजवळ चिठ्ठी सापडली असुन त्यामध्ये सासरकडील लोकांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

ऊसतोड मजुर महिलेस सात दिवस डांबून ठेवत मारहाण

महिला गंभीर जखमी; मुकादमासह पाचविरुद्ध पोलिसात तक्रार

बीडमध्ये साटंलोटं तरीही आरोग्य प्रशासनाचे हाताची घडी तोंडावर बोटं! हॉस्पीटल-सोनोग्राफी सेंटरवाल्यांची मिलिभगत कोणाच्या पथ्थावर?

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील काही हॉस्पिटल आणि सोनोग्राफी सेंटरवाल्यांची सुरु असलेली मिलीभगत सामान्य रुग्णांना आर्थिक संकटाच्या खाईत लोटणारी आहे. आला रुग्ण की पाठवा सोनोग्राफी सेंटरकडे असाच काहीसा फंडा काही डॉक्टरांनी अवलंबविला आहे. हॉस्पिटल आणि सोनोग्राफी सेंटरवाल्यांच्या मिलीभगतचे आणि साटंलोटं असल्याचे संकेत मिळत असुन आरोग्य प्रशासनाची हाताची घडी आणि तोंडावर बोटं पहायला मिळत  आहे. यासर्व बिभत्स प्रकाराकडे वरिष्ठ दुर्लक्ष करीत असल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.

बीड जिल्ह्यात खळबळ एक हत्या ; चौघांची आत्महत्या

बीड : जिल्ह्यासाठी शनिवारचा दिवस घातवार ठरला आहे. एकीची हत्या तर चौघांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. बीडमध्ये जावयाने गळफास लावून जीवन संपविले.केज तालुक्यातील ढाकेफळ येथे एका विद्यार्थीनीची हत्या करून युवकाने आत्महत्या केली. तर तेथीलच जवळबन सेवासोसायटीच्या चेअरमनने विष प्राशन करून जगाचा निरोप घेतला. युसुफवडगाव येथे नवमहिन्यापुर्वी विवाह झालेल्या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. या विविध घटनांमुळे यम जिल्ह्यात मुक्कामी होता की काय? असा प्रश्‍न उपस्थितीत होत आहे.

राज्य बाजार समिती संघाच्या संचालकपदी अशोक डक बिनविरोध

बीड (प्रतिनिधी)
 
महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या संचालकपदासाठी बीड, धाराशिव मतदारसंघातुन येथील बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची आज बिनविरोध संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

पालकमंत्री ना. पंकजाताईंकडून सलीम जहॉंगिर यांच्या मागणीची दखल वाळू घाटांच्या लिलावातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश

बीड ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव रखडल्याने बांधकाम व्यावसायिक , कामगार , मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासंदर्भात गुरुवारी ( दि. ८ ) मुंबईत पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेत  जिल्हा भाजप नेते सलीम जहॉंगिर यांनी  वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीची दखल घेत ना. पंकजाताई यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून लिलाव प्रक्रियेशी संबधित माहिती जाणून घेत तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले.

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर दोन दिवसापासून ठिय्या!

मागण्या तात्काळ मार्गी लावा नसता उपोषण सुरुच-भोसले, पठाण, डावकर

नूर कॉलनीतील पाईप लाईनचा प्रश्‍न लागला मार्गी

बीड, (प्रतिनिधी):- शिवणी रोड लगत असलेल्या नूर कॉलनी येथील पाईप लाईनचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित होता. नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागला असुन नागरिकांमधुन आनंद व्यक्त केला जात आहे. पाणी पुरवठा सभापती शेख मुखीदलाला यांनीही या पाईपलाईनच्या प्रश्‍नासंदर्भात नगराध्यक्ष यांना विनंती केली होती.

बीड पालिकेची ना करवाढ, ना दरवाढ डॉ. भारतभूषण यांचा नागरिकांना दिलासा

बीड, (प्रतिनिधी):- नगर पालिका सामान्य नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यास कटिबद्ध आहे. त्यामुळेच गतवर्षी पेक्षा जास्तीच्या निधीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून यावर्षी तब्बल २८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. अन्य पालिकांमध्ये १० टक्क्याने करवाढ केली जाते मात्र बीड पालिकेत गेल्या २३ वर्षांप्रमाणे यावर्षीही कसल्याही प्रकारची करवाढ , दरवाढ न करता नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे.

कर्जमाफीच्या याद्या मराठीत जाहीर करा नसता जिल्हाभरात शिवसेनास्टाईल आंदोलन - खांडे

बीड (प्रतिनिधी) :-शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून, शिवसेना नेते ना. रामदासभाई कदम व संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव इत्यादी विषयांवर थेट शेतकऱ्यांच्या दारोदार जाऊन विचारपुस करणाऱ्या शिवसेना आपल्या दारी अभियानात आज दि ०८ मार्च रोजी बीड तालुक्यातील बेलुरा व साक्षाळपिंप्री या गावातील शेतकऱ्यांशी शिवसैनिकांनी संवाद साधला.

जिल्हा रूग्णालयातच गॅस सिंलेडर प्लॅन्ट सुरू करावा- आ.जयदत्त क्षीरसागर

बीड, (प्रतिनिधी):- राज्यात जिल्हा रूग्णालयात गॅस सिंलेडर वेळेत मिळत नाहीत त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. यासाठी राज्यातील शासकीय रूग्णालयात वेळेवर ऑक्सीजन गॅस सिंलेडर मिळण्यासाठी जिल्हा रूग्णालयातच गॅस सिंलेडर प्लॅन्ट सुरू करण्यात यावा असा तारांकीत प्रश्‍न उपस्थित करून आ.जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णालयाच्या संदर्भात अनेक महत्वाचे प्रश्‍न मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.

अन्याय अत्याचाराविरूध्द राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे मुक आंदोलन

बीड, (प्रतिनिधी):- महिलांवर होणारे अत्याचार आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हुंडाबळी, कौटुंबिक अत्याचार, वरिष्ठ पदावर असणार्‍या महिलांवरील अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत असून यामुळे महिला असुरक्षित असल्याचे म्हणत विनयभंग, बलात्कार यासारख्या गंभीर घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांनी निवेदनात म्हटले आहे. आज जिल्हा कचेरीसमोर मुक आंदोलन करून प्रशासनाला शिष्टमंडळाने निवेदन दिले. 

निराधारांच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकार्‍यांचे अमरण उपोषण

बीड, (प्रतिनिधी):- शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, निराधार यांच्या प्रश्‍नासंदर्भात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले,  राकॉं अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बरकत पठाण, भाऊसाहेब डावकर यांनी जिल्हा कचेरीसमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सुर्पुद करून मागण्या मान्य करा अशी विनंती केली आहे. 

दुचाकी ट्रक अपघातात तरूण ठार

बीड, (प्रतिनिधी):- समोरून येणार्‍या ट्रकने दुचाकी स्वरला जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे काल उपचारादरम्यान निधन झाल्याची दु:खद घटना घडली. तिगावमार्गे वडवणीला जात असतांना मैंदा पोखरी याठिकाणी समोरून येणार्‍या ट्रक क्रं.एम.एच.२३/४७४० या ट्रकने समोरून येणार्‍या वसंत उर्फ नामदेव किर्जत (वय २६) या तरूणास जोराची धडक दिल्याने गंभीररित्या जखमी झाला होता. काल शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली.

जळीत प्रकरणात सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल!

बीड, (प्रतिनिधी):- माजलगाव तालुक्यात चिंचगव्हाण येथील राधिका गुळकर या महिलेस सासरच्या मंडळीने घरात रॉकेल टाकून जाळल्याची घटना घडली होती. काल रात्री ९ च्या दरम्यान या महिलेची शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा नवरा, सासरा, दोन दिर, भावजई यांच्यावर खुन केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.

जमिअत उलेमाच्यावतीनेही मराठा आरक्षणासंदर्भात समितीला निवेदन

बीड, (प्रतिनिधी):मराठा समाजाच्या सर्वांगीण मागासलेपणाच्या आधारे या समाजाला आरक्षण देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जमिअत उलेमा महाराष्ट्र बीड शाखेच्यावतीने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना देण्यात आले. मराठा समाजाचे ९० टक्क्यापेक्षा अधिक लोक परंपरेने शारिरीक श्रमाचे काम करुन स्वत:चा उदरनिर्वाह करतात. बहुतांश समाज ग्रामीण भागात वास्तव्य करीत आहे.

Pages