कर्जमाफीच्या याद्या मराठीत जाहीर करा नसता जिल्हाभरात शिवसेनास्टाईल आंदोलन - खांडे

बीड (प्रतिनिधी) :-शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून, शिवसेना नेते ना. रामदासभाई कदम व संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव इत्यादी विषयांवर थेट शेतकऱ्यांच्या दारोदार जाऊन विचारपुस करणाऱ्या शिवसेना आपल्या दारी अभियानात आज दि ०८ मार्च रोजी बीड तालुक्यातील बेलुरा व साक्षाळपिंप्री या गावातील शेतकऱ्यांशी शिवसैनिकांनी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी झालेल्या याद्या मराठीत न जाहीर करता इंग्रजीत जाहीर करून शेतकऱ्यांची कुचंबना चालवली आहे. या याद्या बहुतांश शेतकऱ्यांना वाचता येत नसून त्यातुन शेतकऱ्यांची कुचंबना चालवल्याची तक्रार शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी भाजपला गल्ली ते दिल्ली मराठी नकोशी झाल्याने असा प्रताप चालवल्याचे सांगत लवकरात लवकर कर्जमाफीच्या याद्या मराठीत जाहीर कराव्यात नसता शिवसेनास्टाईल आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.
   शिवसेना आपल्या दारी अभियानांतर्गत आज बीड तालुक्यातील बेलुरा, साक्षाळपिंप्री या गावांना शिवसैनिकांनी भेटी दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुखांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना भाजपने किमान जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या याद्या तरी मराठीत करायला हव्या होत्या असे सांगत भाजपचे शेतकरी अन् मराठीवर असलेले प्रेम खोटारडे असल्याचा घणाघाती आरोप यावेळी केला. या अभियानात जिल्हाप्रमुखांसह उपजिल्हाप्रमुख नारायण काशिद, तालुकाप्रमुख उल्हास गिराम, बबन पवार, सरपंच कैलास सामसे, उपसरपंच विठुभाऊ काशीद, बेलुरा येथील भाऊसाहेब गवते, रावसाहेब गवते, सुदर्शन गवते, परमेश्वर गवते, सा पिंप्री येथील माणिक काशिद, मच्छिंद्र किलबिले, धर्मा वखरे, बाळाराम काशिद इत्यादींसह ठिकठिकाणचे शेतकरी, आजीमाजी पक्षपदाधिकारी, शिवसैनिक, युवक, महीला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने अभियानावेळी उपस्थित होते.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.