लाइव न्यूज़
पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडून पत्रकार भास्कर चोपडे यांना एक लाखाचे अर्थ सहाय्य
Beed Citizen | Updated: March 11, 2018 - 3:13pm
शासनाच्या पत्रकार कल्याण निधीतूनही मदत मिळवून देणार
बीड, (प्रतिनिधी):- जेष्ठ पत्रकार भास्कर चोपडे गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारांचा दररोजचा खर्च कुटुंबाला झेपणारा नव्हता, ही बाब पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना समजताच त्यांनी भास्कर चोपडे यांच्या पत्नीशी दुरध्वनी वरून संपर्क साधून त्यांच्या आरोग्याची विचारपूस करून तातडीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत पोहोच केली त्याच बरोबर पत्रकार कल्याण निधीतून मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्रही दिले.
जेष्ठ पत्रकार भास्कर चोपडे गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. शहरातील पत्रकारांनी एकत्र येऊन चोपडे यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा विचार पुढे आणला. शहरासह जिल्हाभरातील पत्रकार बांधवांनी या कामासाठी स्वत:ला झोकून दिले. आणि मिळेल त्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू केला. शनिवारी दुपारी चार वाजता शहरातील पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ संपादकांसह सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला ही बाब पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना समजताच त्यांनी भास्कर चोपडे यांच्या पत्नी व मुलाशी दुरध्वनी वरून संपर्क साधून भास्कर चोपडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली व तातडीने आर्थिक मदत पोहोच केली. यापुढील उपचारासाठी शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी पत्रही दिले तसेच स्वतः मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून हा निधी तातडीने देण्याची विनंती केली. आजारी असलेल्या पत्रकाराच्या मदतीला धावून येत पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या कुटूंबियांना दिलासा दिला.
Add new comment