शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर भाजपकडुन नुसत्या घोषणांची मुक्ताफळे अंमलबजावणी मात्र शुन्य -कुंडलिक खांडे

बीड, (प्रतिनिधी) :- गेल्या ५ मार्चपासून जिल्हा शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून, शिवसेना नेते रामदासभाई कदम व संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांच्या कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव इत्यादी विषयांवर थेट शेतकर्‍यांच्या दारोदार जाऊन चर्चा करणार्‍या शिवसेना आपल्या दारी अभियानात आज दि ११ मार्च रोजी लिंबागणेश सर्कलमधील लिंबागणेशसह मोरगाव, मुळुक, मसेवाडी या गावातील शेतकर्‍यांच्या भेटी घेण्यात आल्या. यावेळी शेतकर्‍यांशी संवाद साधताना भाजपने शेतकर्‍यांच्या प्रश्नावर फक्त घोषणांची मुक्ताफळे वाहीलेली असून अंमलबजावणी शुन्य केल्याचा आरोप यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी केला. 
  भाजपने ऐतिहासिक म्हणत केलेली कर्जमाफी तत्वत: करून शेतकर्‍यांनाच पैसे भरायला लावणारे भाजपा हा देशातील ऐकमेव पक्ष असल्याचा घणाघातही यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेनी शेतकर्‍यांच्या भेटीवेळी केला. आजघडीला शेतकर्‍यांचा भाजपवरचा विश्वास उडालेल्या असून घोषणांची मुक्ताफळं आगामी निवडणुकांमध्ये शेतकर्‍यांना लुभावणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लिंबागणेश, मोरगाव, मुळुक, मसेवाडी इत्यादी गावातील शेतकर्‍यांच्या भेटी यावेळी शिवसैनिकांनी घेतल्या. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह तालुकाप्रमुख उल्हास गिराम, बाळासाहेब जटाळ, रणजित आखाडे, सुधीर कुलकर्णी, मोरगाव येथील अशोक जाधव, बंकट कागदे, चंद्रकांत कागदे, प्रकाश भड लिंबागणेश येथील गणेश मोरे सुरेश ढवळे, अमोल जाधव, अक्षय येडे मुळुक येथील ज्ञानेश्वर ढास, गजानन रंदवे, आकाश शेळके, कृष्णा ढास मसेवाडी येथील बिभिषण मांडवे, चंद्रभान मांडवे, सुरेश मोरे इत्यादींसह ठिकठिकाणचे शेतकरी, आजीमाजी पक्षपदाधिकारी, शिवसैनिक, युवक, महीला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने अभियानावेळी उपस्थित होते.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.