लाइव न्यूज़
Add new comment
शिवसेनेच्या आ. निलमताई गोऱ्हे यांनी उचलली पञकार भास्कर चोपडेंच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी
Beed Citizen | Updated: March 11, 2018 - 3:21pm
?बीड, (प्रतिनिधी):- जेष्ठ पत्रकार भास्कर चोपडे गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत
त्यांच्या वैद्यकीय उपचाराच्या पुर्ण खर्चाची जबाबदारी घेतली असून त्यांनी शिवसेनेच्या यंत्रणेमार्फत चोपडे कुंटूंब व तेथील डॉक्टर्स बरोबर चर्चा केली आहे. आज संध्याकाळी डॉक्टर चोपडेंची तपासणी करून त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करतील त्यांनतर पुढील निर्णय घेतला जाणार अशी प्राथमीक माहिती उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे चोपडे यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत तर आ. निलमताई गोऱ्हे सध्या अमेरीकेत आहेत. पत्रकार भास्कर चोपडे यांच्या कुटुंबीयांनी निलमताई तथा शिवसेनेचे आभार मानले आहे.
.
