बीड शहर

अनुदानप्रश्‍नी निराधारांचा तहसिलसमोर ठिय्या घोषणाबाजीने तहसिल प्रशासन दणाणला

बीड, (प्रतिनिधी):-गेल्या वर्षभरापासून निराधारांच्या रखडलेल्या अनुदानप्रश्‍नी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. निराधारांनी तहसिल कार्यालयासमोर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केल्याने तहसिल परिसर दणाणून गेला होता. आमचे प्रश्‍न मार्गी लावा नाही तर खुर्च्या खाली करा अशा घोषणा यावेळी निराधारांनी देवून प्रशासनाला जागे करण्याचे काम केले. 

३८ कोटींच्या गुंतवणूकीत ठेवीदारांचा जीव गुंतला! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बीड, (प्रतिनिधी):- खाजगी कंपन्यांकडून गुंतवणूकीच्या नावाखाली झालेले गैरप्रकार चर्चेत असतांनाच आणखी एका कंपनीकडून बीडकरांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठेवीची मुदत संपून तीन वर्ष झाले तरी ठेवीचे पैसे परत न मिळाल्याने ठेवीदारांनी एचबीएन डेअरीज ऍण्ड अलाईड लि.कंपनीविरुद्ध आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या कंपनीत २८  हजार लोकांनी तब्बल ३८ कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

दिंद्रुडजवळ नववर्षदिनीच रक्तरंजित राडा पाण्याचा वाद विकोपाला; कुर्‍हाडीने हल्ला; दोघे गंभीर जखमी

बीड, (प्रतिनिधी):- कॅनॉलमधुन पाणी घेण्याच्या कारणावरुन दोन गटातील वाद उफाळून आल्याने एका गटाने दुसर्‍या गटातील लोकांवर कुर्‍हाडीने हल्ला केल्याची घटना दिंद्रुडजवळील उमरी येथे आज सकाळी घडली. यामध्ये दोघे जण गंभीररित्या जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असुन दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

नगराध्यक्षांकडून अपमानास्पद वागणूक; खदीरभाई जवारीवाले यांचा स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार; नगराध्यक्षांवर कारवाईची मागणी

बीड, (प्रतिनिधी):- स्थायी समितीच्या सभेत सूचना करत असतांना समितीचे सभापती तथा नगराध्यक्ष राजकीय हेतूने प्रेरित होवून अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करत आघाडीच्या गटातील स्थायी समितीचे सदस्य खदीरभाई जवारीवाले यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला आहे.

नेकनूरमध्ये विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- खेळत असतांना अचानक विहिरीत पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी नेकनूर येथे घडली.
बीड तालुक्यातील नेकनूर येथील शेख सोफियान शेख रिजवान (१३) हा मुलगा आज सकाळी तेथीलच दर्गाह परिसरात खेळत होता. खेळत-खेळत तो जवळच असलेल्या विहिरीजवळ गेला. त्याठिकाणी खेळतांना विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली.

बीडमध्ये अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावरुन पडल्याने मुलीचा मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावरील किचन गॅलरीतून खाली पडल्याने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विद्यानगर पुर्व भागात घडली.

अंगणवाडी ताईचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षच ठेवा-दिलीप भोसले

बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील अंगणवाडी मधील काम करणारे मदतनीस व सेविका यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे वरुन ६० वर्षे केले आहे तसाच निर्णय राज्य सरकारने वेतन श्रेणी कोणतीही द्यावी पण त्यांना शासकीय सेवेत घ्यावे व महाराष्ट्रातील तेरा हजार मदतनीस व सेविका ह्या निवृत्त होत आहे.

स्वराज्यात स्वाभिमानाने जगायला छत्रपती शिवरायांनी शिकवलं-इंदोरीकर

बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आयोजित शिवजन्मोत्सव व माजी खा.निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमत्त ह.भ.प.समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बीड शहरातील नागरिकांनी अभुतपुर्व गर्दी केली केली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. ह.भ.प.इंदोरीकर महाराजांनी सध्याच्या काळात आई-वडिलांना काही लोक लक्ष देत नसुन त्यांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे.

पुलिस सब जानती है फिरभी अफसाना ढुंड रही है! गांजाची धुंदी उतरेना; अर्थपुर्ण तडजोडीची चर्चा संपेना

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील झमझम कॉलनी भागात पोलिसांनी छापा टाकून १७ किलो गांजा जप्त करुन दोन दिवस झाले तरी त्याची धुंदी मात्र अजुनही कायम असल्याचे दिसुन येत आहे. रात्री उशिरा पोलिसांनी ज्या वाहन क्रमांकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता तो छोटा हत्ती ताब्यात घेतला आहे. आरोपीचा अजुनही पत्ता नसल्याचे सांगितले जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

माझा पक्ष माझा अभिमान माझा स्वाभिमान -ना.पंकजाताई मुंडे

 नांदेड  (प्रतिनिधी):-,भारतीय जनता पक्ष हा एक कुटुंब आहे. हा काही कुटुंबाचा पक्ष नाही. आज जे काही भारतीय जनता पक्षाचे विराटरूप हा देश हे जग बघत आहे हे तुमच्या सारख्या कार्यकर्ते यांच्या मेहनतीचे फळ आहे.माझा पक्ष माझा अभिमान माझा स्वाभिमान आहे ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात असल्याच्या भावना ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या.

सय्यद सलीम यांचे निधन

बीड, (प्रतिनिधी):- बीड पंचायत समितीमधील सेवानिवृत्त लिपीक सय्यद सलीम सय्यद अजीमोद्दीन यांचे काल निधन झाले आहे. मोमीनपुरा येथील रहिवाशी असलेले सय्यद सलीम स.अजीमोद्दीन हे धार्मिकवृत्तीचे असल्याने या परिसरात सर्व परिचित होते. शांत व मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा होता. काल त्यांच्यावर मोमीनपुरा येथे अंत्यसंस्कारक रण्यात आले. यावेळी सर्व स्तरातील नागरिक उपस्थितीत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, ४ मुले, २ मुली असा परिवार आहे.

अंगणवाडी सेविकांना मेस्माच्या कक्षेत आणणार

मुंबई, (प्रतिनिधी):- भाजप सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपाचा धसका घेतला असून अंगणवाडी सेविकांनी संप करू नये यासाठी आता अंगणवाडी सेविका आणि कर्मचार्‍यांना महाराष्ट्र अत्यावश्यक कायद्याच्या अर्थात मेस्माच्या कक्षेत आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

वाहेगावमध्ये हिंस्त्र प्राण्याचा जनावरांवर हल्ला; बिबट्याचा संशय वासराचा ङ्गडशापाडून बैलाची शिंगे तोडली; शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण

गेवराई, (प्रतिनिधी):- अज्ञात हिंस्त्र प्राण्याने आज सकाळच्या सुमारास शेतात बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढविला. त्यामध्ये एका वासराचा ङ्गडशा पाडला असून एका बैलाचे शिंग तोडल्याचा प्रकार आहेर वाहेगाव (ता.गेवराई) येथे घडला आहे. घटनेची माहिती कळताच पशुवैद्यकिय अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली असून दुपारी उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.

राज ठाकरेंची पवारांशी बंद दाराआड चर्चा

मुंबई, (प्रतिनिधी):- मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या एक दिवसाआधीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. या भेटीचा तपशील कळू शकला नाही. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राज्यात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

बीडचा भुमिपुत्र साकारतोय ‘जगावेगळी अंतयात्रा’ एक आनंदी प्रवास! डॉ.विशाल गोरे यांचा चित्रपट २३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला

बीड, (प्रतिनिधी):- समाजातील वास्तव परिस्थिती आणि बेरोजगारीवर आधारीत ‘जगावेगळी अंतयात्रा’ एक आनंदी प्रवास हा मराठी चित्रपट २३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भाऊ कदम यांच्यासह अन्य प्रसिद्ध कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्‍वास चित्रपटातील अभिनेते तथा बीडचे भुमिपुत्र डॉ.विशाल गोरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

बीडमध्ये लाखोंचा गांजा पकडला झमझम कॉलनीत पहाटे कारवाई होवूनही दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल नाही

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील झमझम कॉलनी येथील एका गोडाऊनमध्ये पोलिसांनी छापा टाकला. पहाटे केलेल्या कारवाईत लाखोंचा गांजा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. कारवाई झाली, मोठा मुद्देमालही जप्त केल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले असले तरी त्याचा अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कारवाई होवूनही दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल का नाही? असा प्रश्‍न सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे.

कारागृहातील दोन कैद्यांविरूध्द गुन्हा दाखल

बीड, (प्रतिनिधी): संगनमत करून कारागृहातून पळून जाण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन कैद्यांविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला तर दुसर्‍याने त्यास मदत केल्याचा ठपका दोघांवर ठेवण्यात आला आहे.

आरक्षणाचा वनवास न संपवल्यास तुम्हाला वनवासात पाठवू- भारत सोन्नर

बीड,(प्रतिनिधी):- यशवंत सेना धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकार यांच्या निषेधार्थ संतप्त धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरून या सरकारचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे यशवंत सेना धनगर समाज नेते भारत सोन्नर यांच्या नेतृतवाखाली आंदोलन करण्यात आले या प्रसंगी समाजबाधवांना  मार्गदर्शन करताना भारत सोन्नर म्हणाले की धनगर आरक्षण प्रश्न या सरकाने अद्यापि सोडविलेला नाही आमची सत्ता आलू की पहिल्या मंत्रिमंडळ बैठकात आरक्षण प्रश्न सोडविला जाईल  असे आश्वासन अभ्यास प

Pages