Add new comment

बीडमध्ये आज मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने बैठक

बीड, (प्रतिनिधी):-ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने आज दि. १६ मार्च रोजी इशाच्या नमाजनंतर (८.३० वाजता) एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नर्सरी रोडवरील तकिया मस्जिद येथे होणार्‍या बैठकीमध्ये महिलांसंदर्भात तीन तलाकच्या मुद्यावर चर्चा करण्यात येणार आहे. 
बीड शहरात आज रात्री इशाच्या नमाजनंतर नर्सरी रोडवरील तकिया मस्जिद येथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने विशेष बैठक बोलावण्यात आलेली आहे. महिलांच्या तीन तलाक प्रश्‍नी एका मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून त्यानुषंगाने बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीस उलेमा एकराम यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आि०ण सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने करण्यात आले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.